सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार दुप्पट वाढ ! नविन वेतन आयोग लवकरच लागु होणार .

Spread the love

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच मोठी आंनदाची गुड न्युज येणार आहे .कारण दर 8 -10 वर्षानंतर नविन वेतन आयोगामध्ये बदल करण्यात येते .सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी देशामध्ये सर्वप्रथम पहीला वेतन आयोग 1946 साली स्थापन करण्यात आला होता . तर सातवा वेतन आयोगाची स्थापना 28.02.2014 रोजी करण्यात आली होती .सध्या सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत .

सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री चौधरी म्हणाले कि , सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार वेतन / भत्ते अदा करण्यात येते .यामुळे वेतन व पेन्शन अदा करण्यासाठी नविन आयोगाची गरज नाही . यावरुन स्पष्ट होते कि , सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करता कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुधारणा करण्यासाठी सातव्या वेतन आयोगामध्येच बदल करण्याची शक्यता आहे .जसे कि , महागाई भत्ता 50 टक्के पेक्षा अधिक झाल्यास कर्मचाऱ्यांना ऑटोमेटिक पे रिविजन सिस्टीम पद्धतीनुसार वेतन सुधारणा करण्याची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे .

महागाई भत्ताच्या प्रमाणानुसार वाढेल पगार –

सरकारी कर्मचाऱ्यांना ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकांच्या आधारे महागाई भत्ताचे दर निश्चित करण्यात येते . ज्या प्रमाणात निर्देशांकामध्ये वाढ होईल , त्याप्रमाणात डी.ए मध्ये वाढ होते .सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना AICPI निर्देशांकाच्या आधारे 38 % इतका महागाई भत्ता  मिळत आहे .नविन वेतन आयोगासाठी महागाई भत्ता हा आधारभुत घटक ठरण्याची शक्यता आहे .ज्या वेळी कर्मचाऱ्यांचा डी.ए 50 टक्के पेक्षा अधिक होईल .त्यावेळी कर्मचाऱ्यांना स्वयंचलित वेतनप्रणालीद्वारे वेतन सुधारित दराने मिळेल .

नवा वेतन आयोग कधी लागु होईल –

नविन वेतन आयोगासाठी महागाई भत्ता हा आधारभूत घटक ग्राह्य धरल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना 2023-24 मध्ये नविन वेतन आयोग लागु / आठवा वेतन आयोग लागु होण्याची शक्यता आहे .नविन वेतन आयोग लागु झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होईल .यामध्ये पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये देखिल सुधारणा करण्यात येते .

Leave a Comment