रेशन कार्ड वर जोडा आता तुमच्या मुलांची नावे घर बसल्या ..

Spread the love

रेशन कार्ड मध्ये जोडा आता मुलांची नावे ते पण घर बसल्या. नमस्कार शेतकरी मित्रांनो रेशन कार्ड वर मुलांची नावे कशी जोडायची आणि माहिती कशी अपलोड करायची हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत ते पण सोप्या पद्धतीने. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे किंवा मुलाचं नाव जर रेशन कार्ड मध्ये नसेल तर ते आत्ताच करा अपलोड. कार्ड ऑनलाइन रेशन कार्ड मध्ये रेशन कार्ड असलेली माहिती तपासण्यासाठी बदलण्यासाठी किंवा एखाद्या नाव सामाविष्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त नॅशनल फोर सिक्युरिटी पोर्टलवर जावे लागेल आणि कार्ड ऑनलाइन पद्धतीने जोडावे लागेल …….

रेशन कार्ड मध्ये नाव जोडा

रेशन कार्ड वर नावे जोडण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

https://rcms.mahafood.gov.in/Show_Reports.aspx?RID=116

रेशन कार्ड हे अनेक नागरिकांसाठी एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. यात नोंदवलेल्या माहितीच्या आधारावर नागरिकांचा अन्नधान्य दरात दिली जाते सवलत. त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे खूप महत्त्वाचे आहे. हा कायदेशीर मान्यताप्राप्त दस्तावेज असून यावरील ओळख आणि पत्ता पुरावा म्हणून वापरलाही जाऊ जातो……

अशावेळी हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे की तुमचं कार्ड ऑनलाइन अपडेट असणे हे खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या कुटुंबात मूल जन्माला आलं किंवा दत्तक घेतलं तर त्याचे नाव कार्ड ऑनलाइन मध्ये समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी नेमके काय प्रक्रिया आहे याची माहिती आज तुम्ही पाहणार आहे. कार्ड ऑनलाइन धारकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार रेशन मिळत असते. तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल तर तुम्हाला माहितीच असेल की रेशन दुकानातून युनिट नुसार रेशन दिले जाते .

आता तुम्ही तुमचे कुटुंब तपशील अपडेट करू शकता. फॉर्म सोबत कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करावे लागेल. फॉर्म सबमिट केल्यावर तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल. तुम्ही पोर्टलवरून तुमच्या फॉर्मची माघारही घेऊ शकता. त्यानंतर कागदपत्रे व फार्मचे पडताळणी होते. फॉर्म ची पूर्णपणे तपासणी झाल्यानंतर फॉर्म पोस्टद्वारे तुमच्या घरी पाठवला जातो.

जाणून घेऊया अर्ज भरणे प्रोसेस .

१)रेशन कार्ड वर नवीन सदस्याचे नाव नोंद करण्यासाठी प्रथम अन्नपुरवठा अधिकृत वेबसाईटवर जा.
२)त्यानंतर रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला प्रथम तुमचे आयडी तयार करणे हे खूप महत्त्वाचे आहे.
३)यानंतर (add new member) ऍड न्यू मेंबर हा पर्याय उपलब्ध होईल.
४)त्यानंतर यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म उघडेल.
५)आता तुम्ही तुमच्या कुटुंबाचे अपडेट भरू शकता.

Leave a Comment