राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये , तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत वित्त विभागाकडुन दि.07.10.2022 रोजी महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .यासंदर्भाती वित्त विभागाचा दि.07.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
वित्त विभागाच्या समक्रमांकाच्या दि.02.03.2019 रोजीच्या निर्णयातील परिच्छेद क्रमांक ix मधील ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना यापुर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि.01.01.2016 पुर्वीच लाभ मंजूर केला आहे . अशा कर्मचाऱ्यांना 12 अधिक 8 अशी 20 वर्षाची सेवा ही दि.01.01.2016 पुर्वी पुर्ण होत असल्यास ,संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यास दुसरा लाभ दि.01.01.2016 पासुन पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल .या उपपरिच्छेदाखालील तक्त्त्यामध्ये सुधारणा करण्यात आली असुन , यामध्ये सुधारणा करणेबाबतचा शासन शुद्धीपत्रक दि.07.10.2022 रोजी वित्त विभागाकडुन निर्गमित करण्यात आले आहेत .सविस्तर शुद्धीपत्रक पुढीलप्रमाणे आहे .
ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना या पुर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीमधील पदावर दि.01.01.2016 पुर्वीच पहिला लाभ मंजुर केला आहे , अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 12 + 8 अशी 20 वर्षाची सेवा ही दि.01 जानेवारी 2016 पुर्वी पुर्ण हेात असल्यास संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यास दुसरा लाभ दि.01 जानेवारी 2016 पासुन पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरणार आहे .
उदा – क्ष कर्मचाऱ्याची नियुक्ती दि.01.07.1994 मध्ये मुळ नियुक्ती लिपिक टंकलेखक पदावर पे बँड 5200-20200/- ग्रेड पे 1900/- असणाऱ्या कर्मचाऱ्यास शासकीय सेवेत 12 वर्षे पुर्ण झाल्याने पहिला लाभ दि.01.07.2006 ला अनुज्ञेय झाला आहे .अशा कर्मचाऱ्यास दुसरा लाभ दि.01.07.2018 रोजी अनुज्ञेय असणार आहे .
तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाखाली दुसरा लाभ 20 वर्षानंतर अनुज्ञेय असला तरी दि.01.07.2014 पासुन दुसरा लाभ अनुज्ञेय होणार आहे .सदर योजना दि.01.01.2016 पासुन अंमलात आल्याने , सदर लाभ दि.01.01.2016 पासुन अनुज्ञेय होईल व यापुर्वी दि.01.07.2018 राजी 24 वर्षाचा लाभ मंजुर केला असल्यास , तो लाभ रद्द करुन सुधारित दिनांकास दुसरा लाभ मंजुर करण्यात येणार आहे .व फरकाची रक्कम अनुज्ञेय असल्यास देण्याची तरतुद करण्यात आली आहे .
व तिसरा लाभ सदर कर्मचाऱ्यांना 24 + 6 वर्षे या तत्वानुसार जी तारीख येईल त्या तारखेस पात्रतेनुसार अनुज्ञेय होईल . या संदर्भात वित्त विभागाचा दि.07.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !