राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सेवाविषयक बाबी संदर्भातील सर्व सुधारित शासन निर्णय / परिपत्रके / नियम पुस्तिका .

Spread the love

राज्य शासकी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सेवा विषयक ज्या बाबींवर मोठ्या प्रमाणात संदर्भ केले जातात अशा बाबींसंबंधीचे शासन निर्णय / परिपत्रके / आदेश / नियम / विनियम यांच्या आधारे प्रश्नोत्तरे स्वरुपात खुलासे एकत्रितपणे सदर पुस्तिकामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले असून सदर पुस्तिका राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडुन निर्गमित करण्यात आली आहे .सविस्तर पुस्तिका पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासनाकडुन वेळोवेळी विविध शासन निर्णयामध्ये बदल करण्यात येतो , परंतु हे बदल कर्मचाऱ्यांना / कार्यालय प्रमुखांना अवगत न झाल्यास जुन्या निर्णयाप्रमाणेच अंमलबजावणी करण्यात येते .यामुळे सदर पुस्तिकामध्ये सर्व सुधारित निर्णय / नियम / परिपत्रके नमुद करण्यात आले आहेत .यामध्ये आगाऊ वेतन वाढ , प्रतिनियुक्ती , परिवीक्षाधीन कालावधी संबंधी सर्व बाबी , अनुकंपा तत्वावरील नियुक्ती धोरण ,भारती सेवेतील अधिकाऱ्यांच्या आस्थापना विषयक बाबी तसेच महाराष्ट्र नागरी सेवा ( वर्तवणुक ) , शिस्त व अपील नियमांतर्गत येणाऱ्या सर्व बाबी , विभागीय चौकशी स्पष्ट करण्यात आलेले आहेत .

त्याचबरोबर सेवाभरती नियम, सेवाभरती पद्धती , पदोन्नती नियम , स्थायीकरण ,बदल्या , निवडसुचीची तत्वे आणि सेवाज्येष्ठतेचे नियम याबाबतचे सुधारित धोरण स्पष्ट करण्यात आलेले आहेत .तसेच भविष्य निर्वाह निधी नियम , एकत्रित परिवीक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम , राज्याचे प्रशिक्षण धोणर त्याचबरोबर आस्थापना मंडळ,गोपनिय अहवाल लिहण्यााबाबतचे धोरण ,शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर – सेवेत वाढ / पुनर्नियुक्ती / करार पद्धतीने नियुक्ती ,वाणिज्यिक नोकरी स्विकराण्यासाठी अनुमती विषयक बाबी स्पष्ट करण्यात आलेले आहेत .

तसेच विशेष बाब म्हणुन अग्रिम मंजुर करावयाचे प्रस्ताव ,त्याचबरोबर सेवाविषयक बाबी हाताळणाऱ्या कार्यासनांच्या विषयास अनुसरुन सातत्याने विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे सदर पुस्तिकामध्ये नमुद करण्यात आले आहेत . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाची सदर पुस्तिका PDF मध्ये डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

सेवाविषयक पुस्तिका

Leave a Comment