राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी : केंद्रसरकारच्या धर्तीवर 4% महागाई भत्ता वाढीची घोषणा , आदेश निर्गमित !

Spread the love

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता देवुन दिवाळी सणाची मोठे गिफ्ट दिले आहे .हा वाढीव महागाई भत्ता केंद्र सरकारने जुलै 2022 पासुन लागु केला आहे , यामुळे माहे जुलै ते सप्टेंबर या कालावधीमधील महागाई भत्ता माहे सप्टेंबर महिन्याच्या वेतन / पेन्शन देयकासोबत अदा करण्याचे आदेश केंद्र सरकारकडुन देण्यात आलेले आहेत .

दिवाळी सणाला कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारकडुन सणा अगोदरच महागाई भत्ता मध्ये वाढ करुन दिवाळी गिफ्ट देण्यात येत आहे .त्याचबरोबर दिवाळी सणाला अग्रिम व बोनस जाहीर करण्यात येत आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला वेतनामध्ये मोठी भर पडणार असल्याने , मोठा आर्थिक लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे .दिवाळी सणाला राज्य कर्मचाऱ्यांना देखिल केंद्र सरकारच्या धर्तीवर 4 टक्के महागाई भत्ता वाढ करुन सरकारकडुन कर्मचाऱ्यांना खुश करण्यात येत आहे .यामुळे कर्मचाऱ्यांची मोठी चांदी झाली आहे , ही वाढ महाराष्ट्र राज्य सरकारने नाही तर दिल्ली सरकारने लागु केली आहे .

दिल्लीचे मुख्यमंत्री मा.अरविंद केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात समिती गठीत करण्यात आली होती . सदर समितीने मोठा दिलासादायक निर्णय दिला असुन , दिल्ली सरकार अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के वाढ घोषित करण्यात आली आहे .यासंदर्भातील वित्त विभागाकडुन आदेशही निर्गमित करण्यात आले आहे .या निर्णयामुळे दिल्ली सरकार अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे .

केंद्र सरकारने मागच्या महिन्यात डी.ए वाढीसंदर्भात मोठा निर्णय घेतल्याने , राज्य सरकारकडुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए वाढीची घोषणा करत आहेत .ही वाढ दिवाळी सणा अगोदर होत असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे .

Leave a Comment