State Employee : राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय केंद्राप्रमाणे 60 वर्षे बाबत ,राज्य सरकार सकारात्मक !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्यात येणार आहे .महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहे , तर वर्ग – 4 कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे .सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची अतिरिक्त सेवेचा लाभ प्राप्त होणार आहे .

केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिृत्तीचे वय 60 वर्षे केल्याने , देशातील इतर 25 राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत निर्णय घेण्यात आले आहेत . याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावी अशी मोठी मोठी कर्मचाऱ्यांकडुन होत आहे . नुकतेच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने दि.27 सप्टेंबर 2022 रोजी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत , निवेदन सादर करण्यात आले आहेत . शिवाय जे कर्मचारी वयाने उशिरा शासन सेवेत रुजु झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना सेवेचा कालावधी कमी मिळतो .सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यास , कर्मचाऱ्यांना 2 वर्षे अधिकची सेवा मिळतो .

त्याचबरोबर सध्या महाराष्ट्र शासन सेवेत अनेक पदे रिक्त आहेत , तसेच मागील तीन वर्षांपासुन कोणतीही मोठी पदभरती प्रक्रिया झालेली नाही . यामुळे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणेबाबत राज्य सरकार देखिल सकारात्मक असून , या संदर्भात राज्य सरकारकडुन लवकरच मोठा निर्णय घेण्यात येणार आहे .कारण आतापर्यंत विविध कर्मचारी संघटनांकडुन सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणेबाबत अनेक निवेदने राज्य सरकारला सादर करण्यात आले आहेत .

Leave a Comment