8th Pay Commission : आठवा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार भरमसाठ वाढ !

Spread the love

सातव्या वेतन आयोगानुसार , केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या अनेक पदांच्या पगारामध्ये तफावत असल्याने कामगार युनियनकडुन पगारवाढीसाठी / पुढील वेतन आयोगासाठी मागणी करण्यात येत आहे .आठवा वेतन आयोग / पगारवाढ करणेबाबत कर्मचारी संघटनांकडुन एक प्रस्ताव देखिल तयार करण्यात आलेला असून , सदर प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु होण्याची चिन्हे दिसुन येत आहेत .

किमान मुळ वेतनामध्ये होणार वाढ !

कामगार युनियनकडुन फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करणेबाबत मोठी मागणी करण्यात आलेली असून , सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे मुळ वेतन मिळते , तर या फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ करण्याची मागणी कामगार युनियनकडुन करण्यात आली असून सदर मागणीवर कामगार युनियनकडुन जोर धरण्यात आला असल्याने कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2.57 पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे किमान मुळ वेतन 18,000/- मिळते ,सदर फिटमेंट फॅक्टरमध्ये 3.68 पट वाढ लागु केल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये आठ हजार रुपये वाढ होणार आहे .म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन हे 26,000/- रुपये होईल .

आठव्या वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या किमान मुळ वेतनामध्ये 3.68 पट म्हणजेच 44.44% वेतनवृद्धी होणार आहे .यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भरमसाठी वाढ होणार आहे .सातव्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 14.29% वेतनवृद्धी करण्यात आलेली होती .सदर वेतन आयोगासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यास , इतर राज्य सरकार देखिल नवा वेतन आयोगाचा स्विकार करतील .

Leave a Comment