शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर : एक टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध , शासन निर्णय निर्णय निर्गमित GR दि.10.10.2022

Spread the love

राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदतीसाठी सन 2022-23 मधील अर्थसंकल्पीत तरतूदीचे वितरण करणेबाबत , शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याज दराने अर्थसहाय्य करणेबाबतचा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि.10.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र शासनाने सन 2022-23 या वर्षामध्ये शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्के दराने अर्थसहाय्य योजने अंतर्गत 1500 लाख रुपये वितरणासाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत .यापैकी 315 लाख रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यात आलेले असून आता 210 लाख रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यात या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .सदरची मंजुर निधी संबंधित बँका /संस्थांस वितरीत करण्यात आली आहे .यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे व त्याची प्रत शासनास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

सदर शासन निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्जासाठी निधींची उपलब्धता संबंधित बँकास उपलब्ध करुन देण्यात आल्याने शेतकऱ्यांना एक टक्के व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे .शेतकऱ्यांना सदर योजना अंतर्गत सन 2013-14 पासून 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज अल्पमुदतीसाठी देण्यात येते .सदर योजनेचा लाभ खासगी बँकामध्ये देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे ..

अधिक माहीतीसाठी या संदर्भाती सहकार व वस्त्रोद्योग विभागाचा दि.10.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202210101502596402 ) डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment