भारत देश हा एक कृषीप्रधान देश असल्याचे आपल्याला माहितीच आहे , भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे . पशुसंवर्धन हे क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेमधील महत्वपुर्ण व्यवसाय आहे . याकरीता शासनाकडुन या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक केली जात आहे .पशुसंवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे , याकरीता शासनाकडुन राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारासाठी शेतकऱ्यांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .
गोपाल रत्न पुरस्कार –
केंद्र सरकारकडुन दरवर्षी हा पुरस्कार पात्र शेतकऱ्यांना दिला जातो . याकरीता दरवर्षी शेतकऱ्यांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येते .याकरीता केंद्र शासनाच्या https://awards.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे .या स्पर्धेचे आयोजन केंद्र सरकारकडुन करण्यात येत असल्याने , सदर योजनेचा शेतकऱ्यांनी घ्यावी याकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आव्हान पशुसंवर्धन आयुक्त श्री.सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडुन करण्यात आले आहेत .
गोपाल रत्न पुरस्कार तीन श्रेणीमध्ये दिला जातो , प्रथम श्रेणीमध्ये उत्कृष्ट पशुपालक यामध्ये निवडक 50 गायींच्या जाती व 17 म्हशींच्या जातींचे पालन करुन पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकरी / पशुपालकास दिला जातो .दुसऱ्या श्रेणीमध्ये राज्य शासन , केंद्र शासन , पशुसंवर्धन विकास मंडळे , राज्य दुध महासंघ , स्वयंसेवी संस्था आणि तिसऱ्या श्रेणीमध्ये इतर खासगी संस्थांना पुरस्कार देण्यात येतो .सदर पुरस्कार दुग्ध व्यवसायाची मात्रा वाढविण्यासाठी देण्यात येतो .
पुरस्काराचे स्वरुप –
वरील प्रत्येक श्रेणीमध्ये प्रथक क्रमांकास 5 लाख रुपयांचे बक्षीस तर द्वितीय क्रमांसाठी 3 लाख रुपये व तृतीय क्रमांसाठी 2 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात येते . सोबत गुणवत्ता प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देण्यात येते . सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी वरील नमुद संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करुन रोख 5 लाखांचे बक्षीस जिंकु शकाल .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !