सरकारने पारित केला नवा कामगार कायदा : कर्मचारी हिताचे मोठे महत्वपुर्ण सुधारित नियम .

Spread the love

देशामध्ये केंद्र सरकारने नवा कामगार कायदा पारित केला आहे .केंद्रीय कामगार मंत्रालयाकडुन कामगार नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे . यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे . यामध्ये प्रामुख्याने ग्रॅच्युईटीवर भर देण्यात आला आहे . ह्या नविन कामगार कायद्याचा स्विकार जवळपास सर्व राज्यांनी स्विकाराला आहे . यासंदर्भातील कामगार कायद्यामध्ये कोणत्या सुधारित तुरतुदी लागु करण्यात आल्या आहेत ,याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

या सुधारित कामगार कायद्यामुळे कर्मचाऱ्यांना आता एक वर्ष काम करताच गॅच्युईटीचा लाभ मिळणार आहे , जे या अगोदर किमान पाच वर्ष काम केल्यासच ग्रॅच्युईटीचा लाभ दिला जात होता .यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे .त्याचबरोबर या नव्या सुधारित तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांकडुन आठवड्याभरात  48 तासापेक्षा अधिक तास काम घेतले जाणार नाहीत , शिवाय आठवड्याभराचे काम कर्मचारी चार दिवसांमध्ये देखिल पुर्ण करु शकणार आहेत .त्याचबरोबर कर्मचाऱ्यांने 180 दिवस काम केल्यास सदर कर्मचाऱ्यांस दीर्घ सुट्टीचा लाभ अनुज्ञेय असणार आहे . या अगोदर ही मर्यादा 240 दिवसांची होती .

त्याचबरोबर महिला कर्मचाऱ्यांच्या सहमतीशिवाय त्यांना रात्रपाळीत काम  करण्यासाठी दबाव टाकता येणार नाही .परंतु या नविन नियमानुसार कर्मचाऱ्यांस इन हॅन्ड पगारामध्ये कपात होणार आहे , कारण कर्मचाऱ्याचे पीएफ मधील योगदान वाढविल्याने , कर्मचाऱ्यास हातात कमी वेतन मिळणार आहे .परंतु सदर कपात रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येणार आहे .जेणेकरुन सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांस वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे .

Leave a Comment