राज्य कर्मचारी हिताचा आज रोजीचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय ! 1 जुलै 2021 पासुनची थकबाकी देण्याचे आदेश .दि.11.10.2022

Spread the love

राज्य शासन सेवेतील कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आज रोजीचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिपत्याखालील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील नियमित अधिकारी / कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागु करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.11.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे .

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातील नियमित आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01.07.2021 पासुन सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी शासन निर्णयामध्ये नमुद अटींच्या अधिन राहुन मान्यता देण्यात आली आहे .सदर महामंडळामध्ये एकुण 14 पदे कार्यरत असुन सदर पदांनुसार सुधारित वेतनश्रेणी लागु करण्यात आली आहे .यामध्ये महामंडळाने वित्त विभाग /शासनाकडुन 7 व्या वेतन आयोगासंदर्भात निर्गमित करण्यात आलेले दि.30.01.2019 , दि.20.02.2019 त्याचबरोबर वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या शासन निर्णय / परिपत्रकातील अटी / शर्तीनुसार सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .

त्याचबरोबर सुधारित वेतनश्रेणीचा लाभ देताना शासनामधील समकक्ष पदांना लागु करण्यात आलेल्या वेतनश्रेणीपेक्षा महामंडळातील अधिकारी / कर्मचारी यांना मिळणरा लाभ जास्त असू नये . असे आदेशित करण्यात आले आहेत .सद्यस्थितीमध्ये महामंडळाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या संवर्गातील अधिकारी / कर्मचारी यांनाच सुधारित वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय असणार आहे .नविन संवर्ग पदे निर्माण केल्यास सदर लाभ अनुज्ञेय करतेवेळी शासनाची पुर्व मंजुरी घेणे आवश्यक असणार आहे .

सदर आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01.07.2021 ते सुधारित वेतनश्रेणीची अंमलबजावणी करेपर्यंतच्या कालावधीतील थकबाकी एकरकमी अदा करण्यात येणार आहे .या संदर्भातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे दि.11.10.2022 रोजीचे शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment