मित्रांनो, तुम्हीही आता स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करू शकता : जाणून घ्या काय प्रक्रिया आहे ? आणि किती खर्च येतो ?

Spread the love

तुम्हालाही स्वतःचा पेट्रोल पंप असावा असे अनेकदा वाटत असेल आणि तुम्ही जर पेट्रोल पंप सुरू करायचा प्लॅन करत असाल, पण माहितीच्या अभावी तुम्ही तुमच्या या प्लॅन वरती प्रत्यक्षात उतरलेले नसाल, तर आपण आज या लेखामध्ये पेट्रोल पंप व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. सरकारने सुद्धा पेट्रोल पंप सुरू करण्याबाबतचे विविध नियम बदलले आहेत. यामुळेच पेट्रोल पंप सुरू करणे आता सर्वाधिक सोपे झाले आहे. पेट्रोल पंप सुरू करण्याची नक्की काय प्रक्रिया आहे याबद्दल जाणून घेऊया.

सात सरकारी कंपन्या

आपल्या देशामध्ये IOC, BPCL, HPCL या सरकारी कंपन्यांसोबतच इतर सात कंपन्या पेट्रोलचे रिटेलिंग करत असतात. मात्र टर्नओव्हर च्या आधारावरती या कंपन्यांपैकी काही कंपन्या उद्योगात उतरू शकतात. असे शासनाने मागच्या वेळेस स्पष्ट केलेले होते. त्यामुळे आता तुम्ही सुद्धा कोणत्याही कंपनीच्या अंतर्गत स्वतःचा पेट्रोल पंप सुरू करू शकता. जर तुम्हाला आयओसी या शासनाच्या कंपनीचे पेट्रोल पंप सुरू करायचं असेल. तरी याबाबतचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या त्यामुळे तुम्हाला स्वतःच्या पेट्रोल पंप सुरू करणे अधिक सोपे जाईल.

पेट्रोल पंप कोण सुरू करू शकतं ?

आपल्या भारत देशामध्ये एखाद्या व्यक्तीला पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर तो व्यक्ती देशाचा नागरिक असणे आवश्यक आहे. यासोबतच अर्जदार हा दहावी पास असावा. यापूर्वी पात्रता बारावी पास ची होती पण आता दहावी पास अर्जदार चालेल. पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी लागणारी जमीन तुमची स्वतःची असेल तर मग काही अडचण नाही पण तुम्ही भाड्याने जमीन घेऊन पेट्रोल पंप सुरू करणार असाल तर तुम्हाला त्या जमिनीच्या मालकासोबतची कागदपत्रे तयार करणे बंधनकारक राहील. तुमच्याकडे जमीन नसेल तरीसुद्धा तुम्ही पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता. पण त्या ठिकाणी अर्जामध्ये तसा उल्लेख करणे आवश्यक राहील.

पेट्रोल पंप कसा मिळतो ?

अर्ज केल्यानंतर कंपन्या आपल्या जमिनीची स्थिती पाहून पेट्रोल पंप देण्याचा निर्णय घेत असते. पेट्रोल पंपा साठी कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऍडव्हर्टाईस मध्ये काही अटी आणि नियम नमूद केलेल्या असतात. त्यामध्ये जमिनीच्या संबंधित सुद्धा काही महत्त्वाचे नियम असतात. अशावेळी जमीन आणि तुमचा अर्ज बघूनच कंपन्या निर्णय घेतात. यासोबतच पेट्रोल पंप देण्यासाठी तुमची मुलाखत त्या ठिकाणी घेतली जाते आणि ग्रामीण व शहरी भागाचा विचार करून फीबाबतचा जो काही निर्णय आहे तो घेतला जातो. तुमच्या पेट्रोल पंपाचे लोकेशन नक्की कुठे आहे, त्यावरती शुल्क निर्धारित केली जाते. सर्वसाधारणपणे सुमारे 20 ते 50 लाख रुपये पर्यंत शुल्क आकारले जाते.

अर्ज कसा करणार

अनेक कंपन्या नवनवीन पेट्रोल पंप सुरू करण्या बाबतच्या आर्डव्हर्टाईस देत असतात. या आर्डव्हर्टाईस मध्ये अर्ज कशा प्रकारे करावा? याची माहिती सुद्धा दिली जाते आणि एवढेच नाही तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी अर्ज स्वीकारले जातात. यामुळेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा पेट्रोल पंपासाठी अर्ज करू शकता.

किती नफा मिळतो ?

दिल्लीमध्ये पेट्रोल रेट च्या हिशोबाने जर आपण अंदाज बघायचा झाला. तर सध्या दिल्लीमध्ये पेट्रोलचे भाव 112 रुपये प्रति लिटर एवढे आहेत. त्यामध्ये पेट्रोलची बेस्ट प्राईस ही 40.34 प्रति लिटर असते. याचा अर्थ असा आहे की डीलर ला कोणत्याही ड्युटी किंवा व्हॅन न लावता पेट्रोल 40 ते 46 रुपये मध्ये दिले जाते यानंतरच त्या ठिकाणी 52 रुपये एक्सरसाइज ड्युटी व आठ रुपये डीलरचे कमिशन आणि पंचवीस रुपये व्हॅटचा समावेश त्या ठिकाणी असतो. म्हणजे एका डीलर ला प्रति लिटर पेट्रोल मागे कमिशन हे आठ ते बारा रुपये पर्यंत मिळते. यासोबतच डीलरला अनेक फायदे सुद्धा मिळतात.

Leave a Comment