सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर! फक्त हे काम करा, पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नक्कीच तुमच्या खात्यात लवकर येतील !

Spread the love

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून जमा केले जातात. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम विभागून तीन हंगामामध्ये दिले जाते. एक म्हणजे खरीप, दुसरा म्हणजे रब्बी आणि तिसरा म्हणजे उन्हाळी. या तिन्ही हंगामामध्ये प्रति हंगाम 2000 अशाप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आर्थिक साह्य म्हणून जमा केले जातात. अजून खरीप हंगामा मधील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली नाही. कारण की भुलेखांच्या पडताळणीला विलंब होत असल्यामुळे पुढील प्रक्रियेलाच वेळ लागला आहे. ज्यावेळी भूलेखाची पडताळणी पूर्ण होईल त्यावेळी संपूर्ण वेरिफिकेशन पूर्ण झाले की शेतकऱ्यांच्या खात्यावरती सन्मान निधी जमा होईल.

पंतप्रधान किसान योजना अपडेट (PM Kisan Yojana Update) :

सध्या भूलेखाच्या पडताळणीमुळे हा हप्ता विलंब होत आहे. पण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा बारावा हप्ताह ऑक्टोंबर महिन्यात कोणत्याही तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो .लेखाची पडताळणी करत असताना कित्येक शेतकऱ्यांना या योजनेतून रद्द करण्यात आलेले आहे. कारण की ते या योजनेत बसतच नव्हते तरीसुद्धा लाभ घेत असल्यामुळे त्यांची नावे या योजनेतून रद्द केली आहेत. फक्त उत्तर प्रदेश मध्येच बघायचे झाले तर 21 लाख लोकांना या योजनेसाठी अपात्र म्हणून घोषित केले आहे आणि इतर राज्यांमध्ये सुद्धा अशीच आकडेवारी दिसून आली आहे.

शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचे आर्थिक मदत

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाते चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपये खात्यामध्ये भरून तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम पूर्णपणे जमा होते.खरीप हंगामा मधील हप्ता हा सप्टेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होता, पण जमिनीच्या नोंदी पडताळणीमुळे ह्या प्रक्रियेला विलंब लागला आहे. पण ह्या महिन्यामध्ये हा हप्ता नक्कीच भेटेल असे चिन्ह दिसत आहे.

PM किसान योजनेशी संबंधित समस्यांसाठी येथे संपर्क

तरीसुद्धा शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान योजना बद्दल तुम्हाला काही तक्रार किंवा शंका असेल तर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांक वरती संपर्क साधू शकता आणि तिथे तुम्ही शंका किंवा तक्रार मांडू शकता. पंतप्रधान किसान योजनेचा हेल्पलाइन नंबर आहे 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092. ह्या नंबर वरती संपर्क साधून तुम्ही तुमची शंका दूर करू शकता.

याशिवाय, यादीमध्ये नाव कसे पाहणार ?

  • सर्वप्रथम pmkisan.gov.in या PM किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल त्यानंतर , Farmers Corner वर क्लिक करा.
  • नंतर लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करून ,तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
  • येथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक यासोबतच मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर , तुम्हाला तुमच्या सध्याच्या स्टेटसची संपूर्ण माहिती त्याठिकाणी मिळेल.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची लागणारी ई-केवायसी ची प्रक्रिया करण्यासाठी वेळेची मर्यादा काढून टाकण्यात आलेली आहे. मात्र आताही ई-केवायसी पूर्णपणे अनिवार्य आहे. जर तुम्ही अशा शेतकऱ्यांपैकी असाल ज्यांनी आतापर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. तर ते आता बाराव्या हप्त्यापासून वंचित राहतील. तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.

Leave a Comment