राज्यातील शासकीय व निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना दिवाळी सणा अगोदर पगार अदा करणेबाबत राज्य शासनाच्या वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत .दिवाळी सणा अगोदरच म्हणजेच 24 तारखे अगोदरच राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव डी.ए व वाढीव बोनस जाहीर होण्याची मोठी शक्यता आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला मोठा आर्थिक लाभ प्राप्त होणार आहे .
महाराष्ट्र राज्य शासनाकडुन राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळी सणाच्या अगोदर म्हणजेच दि.24 ऑक्टोंबरपुर्वी अदा होण्याची मोठी शक्यता असल्याने , राज्यातील कोषागार विभाग सतर्क झाले आहेत .दिवाळी सण जवळ आली असून ,माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळी अग्रिमसह /बाेनससह अदा अदा करायचा असल्याने सदर देयके तपासणी करुन अदा करणेबाबत आदेशित करण्यात आले आहेत .कर्मचाऱ्यांकडुन दिवाळी सण अग्रिम/ बाेनस अर्ज भरुन , सदर कर्मचाऱ्यांच्या नावे मागील कोणतही अग्रिम बाकी नाहीत हे तपासण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत .दिवाळी सण 24 तारखेला असल्याने वेळ कमी असल्याने , कोषागार कार्यालयांमध्ये इतर देयके जसे वैद्यकिय , प्रवास देयके अदा न करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत .
महागाई भत्तामध्ये होवू शकते वाढ !
राज्यातील विविध संघटनांकडुन निवेदने देवून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य शासकीय / निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापुर्वी 4 टक्के महागाई भत्ता वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे .यासंदर्भात राज्य शासनाकडुन सकारात्मक निर्णय घेतल्यास , कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ मिळणार आहे .ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे .
कोषागार विभागाच्या या वेगावन हालचालींमुळे राज्यातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे पेन्शन दि. 24 ऑक्टोंबरपुर्वीच अदा करण्यात येईल . यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला मोठा आर्थिक सहाय्य होणार आहे .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !