राज्यातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळी सणापुर्वी म्हणजेच 24 ऑक्टोबर 2022 पुर्वीच अदा करणेसंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय ,मुंबई यांचे दि.11 ऑक्टोंबर 2022 रोजी महत्वपुर्ण शासन परीपत्रक निर्गमित झालेला आहे .या संदर्भातील शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांचे सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना , कोकण विभाग यांचे निवेदन संबंधित कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर सदर परीपत्रक निर्गमित झालेला आहे .सदर पत्राचा विषय दिवाळीपूर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर बंधू – भगिनींचा माहे ऑक्टोंबर 2022 चे वेतन मिळणेबाबत असा आहे .या निवेदनाला अनुसरुन विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्याकडुन पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे . शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर 2022 चे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्याबाबत प्रचलित शासन निर्णयानुसार आवश्यक ती उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कार्यालयास सादर करणेबाबत , शिक्षणाधिकारी , शिक्षण निरीक्षक , अधिक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांना परिपत्रक सादर करण्यात आले आहे .
सदर अहवालाची प्रत अध्यक्ष्य महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोकण विभाग यांना सादर करण्यात आली आहे .यामुळे कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी सादर होण्याची चिन्हे दिसत आहेत .या संदर्भातील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय , मुंबई यांचे दि.11.10.2022 रोजीचे परीपत्रक पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !
कोतवाल कर्मचारी याना ही काहीतरी पगार वाढ दया म्हणाव फक्त कामे करून घेतात रात्र दिवस कामे करून घेतात कमीमानधन देतात