नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : आता 3 लाख पर्यंतच्या पीक कर्जावरील व्याजदर माफ .

Spread the love

महाराष्ट्र राज्य मधील नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक महत्त्वाची व आनंदाची बातमी. आज आम्ही घेऊन आलो आहोत सन 2021 – 22 या वर्षाकरिता ज्या शेतकरी बंधू-भगिनीनि तीन लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊन त्याची विविध मुदतीमध्ये परतफेड केली असल्यास त्या सर्व शेतकऱ्यांची घेतलेल्या कर्जाच्या रकमेच्या व्याजावरती सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

म्हणजेच या शासकीय योजनेद्वारे व्याजाची जी काही रक्कम असणार आहे. ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. याबद्दल राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण असा शासकीय निर्णय घेऊन ही माहिती समोर आली आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना यासोबतच कधीपर्यंत हे रक्कम परत दिली जाईल म्हणजेच खात्यावरती जमा केली जाईल याबद्दलचे संपूर्ण माहिती आज आपण आजच्या लेखांमध्ये घेणार आहोत. तरी कृपया लेक शेवटपर्यंत वाचवा आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींपर्यंत शेअर करावा.

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना

राज्यांमधील शेतकऱ्यांना अल्पमुदतीमध्ये पीक कर्ज घेण्यासाठी व्याजाची सवलत देण्यास शासनाने डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत ही शासकीय योजना अमलात आणली आहे. या योजनेमध्ये 11 जून 2019 रोजी काहीसे बदल करण्यात आले आहेत. या बदलांतर्गत राज्यांमधील शेतकरी ज्यांनी तीन लाख रुपये कर्ज घेतले आहे आणि त्याच कर्जाची परतफेड व्याजासहीत वेळेवरती भरलेली आहे, अशा शेतकऱ्यांना या शासकीय योजनेअंतर्गत व्याजावरती सवलत दिली जाईल.

पावसाळी अधिवेशनामध्ये या संबंधित तीन लाख रुपये पर्यंतच्या मुदतीची मागणी करण्यात आली होती आणि त्याच मागणीला मान्यता आता मिळाली आहे. यासाठी शासनाने 300 कोटींची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात आलेली होती. शासन निर्णय सुद्धा या संबंधित प्रकाशित करण्यात आलेला होता, यासाठी जवळपास 48 कोटी रुपयांच्या निधी वितरित केला गेला होता.

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज

डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून तीन लाख रुपये पर्यंत नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जे काही वरील व्याज होते त्यामध्ये सवलत देण्यासाठी 10 ऑक्टोंबर रोजी शासन निर्णय घेण्यात आलेला असून, या निर्णया अंतर्गत 32 कोटी रुपयांचा निधी शासनाने वितरित करण्यास मान्यता दिली आहे, 2021 – 22 या वार्षिक कालखंडात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना आणि त्यांची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यावरील व्याजाची सवलत देण्यात येईल आणि हा जो निधी आहे तो पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल.

सन 2021 – 22 वर्षासाठी राज्य सरकारद्वारे 300 कोटी रुपयांचा निधी ची तरतूद या व्याज सवलतीसाठी करण्यात आलेली असून, आता त्यापैकी 220 कोटी रुपयांचा निधी अजून वितरित करणे बाकी आहे. त्यामुळे लवकरच शासनातर्फे हा जो काही निधी असेल तो वितरित केला जाईल, याची शक्यता वर्तवली आहे. दिवाळीपर्यंत किंवा दिवाळीच्या नंतर जे कोणी पात्र शेतकरी असतील त्यांच्या बँक खात्यामध्ये ही शासनाचे सवलत जमा होईल.

शासन निर्णय

Leave a Comment