राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना विविध रजा लागु करण्यात येते .सदर रजा राज्य कर्मचाऱ्यांना रजा नियम 1981 नुसार लागु करण्यात येते .महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1981 मध्ये रजेसंदर्भात सर्व नियमावली देण्यात आली आहे . सदर रजेच्या नियमांमध्ये वेळोवेळी व आवश्यकतेनुसार काही बदल करण्यात आलेले आहेत .बदल करण्यात आलेल्या विशेष नैमित्तिक रजेविषयीची संपुर्ण माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य कर्मचाऱ्यांना Special Casual Leave ( विशेष नैमित्तिक रजा ) अंतर्गत वेतनी रजा मिळते .या विशेष नैमित्तिक रजेमध्ये राज्य सरकारकडुन वेळोवेळी बदल करण्यात आलेले आहेत .यामध्ये विशेष बाबींसाठी रजेची सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे .यामध्ये पिसाळलेला कुत्रा अथवा तत्सम जनावराने चावा घेतल्यास , 21 दिवसांची विशेष नैमित्तिक रजा मिळते . त्याचबरोबर स्वत : नसबंदी शस्त्रक्रिया केल्यास , कर्मचाऱ्यांस 6 दिवस रजा मिळते .तसेच कर्मचाऱ्यांच्या पत्नीने बाळंतपणानंतर लगेचच संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास , सदर कर्मचाऱ्यास 4 दिवस तर बाळंतपणाव्यतिरिक्त अन्य वेळी संतती नियमनाची शस्त्रक्रिया केल्यास 7 दिवस रजा मिळते . तर महिला कर्मचाऱ्यास 14 दिवस विशेष नैमित्तिक रजा मिळते .
त्याचबरोबर कर्मचाऱ्यांने स्वेच्छेने विनामुल्य रक्तदान केल्यास , अशा कर्मचाऱ्यास एक दिवसाची विशेष नैमित्तिक रजा अनुज्ञेय होते .त्याचबरोबर राष्ट्रीय क्रिडा स्पर्घेत भाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यास एका वर्षामध्ये 30 दिवस रजा अनुज्ञेय करण्यात येते .किरकोळ रजा बिनपगारी करण्यात येते नाही , परंतु किरकोळ रजा नामंजुर करणे , नाकारणे ,अथवा रद्द करणे तरतुद कायद्यात नाही .किरकोळ रजा ही रजा समजली जात नसली तरी , अर्जित किंवा अन्य प्रकारच्या रजेला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही .
विशेष नैमित्तिक रजा संदर्भातील बाबी व रजा सवलत बाबतचे सविस्तर विवरण पुढीलप्रमाणे पाहु शकता .

- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !