50 हजार प्रोत्साहन अनुदानाबद्धल मोठी बातमी ! जाणून घ्या कधी येणार पैसे , चेक करा तुमची पात्रता !

Spread the love

पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आज आम्ही घेऊन आलो आहोत. सन 2019-20-21 या तीन वर्षांमधील किमान दोन वर्षे पीक कर्जाची परतफेड ज्या शेतकऱ्यांनी केली आहे, त्याच शेतकऱ्यांना शासनाकडून महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान म्हणून 50 हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल.

शासनाने घेतलेल्या या निर्णयाप्रमाणे अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपयांचे रक्कम जमा केली नाही, काय आहे त्या मागील मुख्य कारण? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम का अजून जमा झाली नाही? या योजनेअंतर्गत शासनाचे नक्की कोणते काम बाकी राहिले आहे? याबद्दल सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत.

या तारखेला यादे प्रकाशित होणार होत्या, मग काय झाले ?

15 ऑक्टोबर पासूनच जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करत होते त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करणार असे सांगण्यात आलेले होते. ज्यासाठी याद्या सुद्धा मागवल्या होत्या, परंतु बँकांकडून ज्या याद्या मागल्या त्या यादीमध्ये जवळपास सात लाख हून अधिक शेतकऱ्यांची चुकीची माहिती मिळाल्यामुळे चुकीची माहिती असलेल्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले. यामुळे याद्या या अनुदानासाठी पुढे गेल्या नाहीत. परंतु विधानसभेच्या झालेल्या बैठकीत याद्या या 12 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित केले जातील असा निर्णय घेतला होता. मात्र अजूनही या याद्या प्रकाशित केल्या नाहीत. नक्की या याद्या कधी प्रकाशित होतील आणि आपल्या खात्यावरती रक्कम कधी जमा होईल याची वाट शेतकरी बांधव पाहत आहेत.

कशी पाहाल तुमची पात्रता?

पैसे खात्यावर जमा होण्याआधी तुम्ही या योजनेचे पात्र आहात की नाहीत हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला अनुदान मिळेल की नाही याबाबत खात्रीशीर माहिती घेणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमची जी काही कागदपत्रे आणि पात्रता आहेत ती तपासू शकता. यासाठी तुम्ही सीएससी पोर्टल वरती जाऊन तुम्हाला तुमची पात्रता यासोबत तुमचे बँक खाते तपासता येईल. यानंतर तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टल वरती सुद्धा जावे लागेल. त्या पोर्टल वरती जाऊन विचारलेली संपूर्ण माहिती भरून घ्यावी, माहिती भरून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तुमची पात्रता आणि कागदपत्रे तपासू शकता. पूर्णपणे शेतकरी बंधू-भगिनी पात्र झाल्यानंतरच या याद्या बँकांमार्फत प्रकाशित केले जातील आणि यादीमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना लवकरच अनुदानाची रक्कम दिली जाईल.

Leave a Comment