राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना थकबाकीच्या रकमा व्याजासह प्रदान करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित . GR दि.14.10.2022

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील अधिकारी / कर्मचारी यांना 6 व्या वेतन आयोगाच्या स्तर – 2 मध्ये जमा रकमा व्याजासह परत करणेबाबत कृषी , पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.14.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे , या संदर्भातील सविस्तर GR पुढीलप्रमाणे पाहुयात .

वित्त विभागाचा दि.14.12.2010 रोजीच्या शासन निर्णयान्वये ज्या कर्मचाऱ्यांची सहाव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत स्तर – 2 मध्ये जमा करण्यात आलेली आहे . त्यांना एकुण देय रकमेचा परतावा त्यावरील व्याजासह परत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे .सदरच्या रकमा मंजुर करण्याकरीता संबंधित कर्मचारी ज्या कार्यालयामध्ये कार्यरत आहेत , त्या कार्यालयाच्या प्रमुख यांना प्राधिकृत करण्यात येत आहे .जे कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त / राजीनामा / बडतर्फ किंवा मृत्यु या कारणाने सेवेत नाहीत .अशा कर्मचाऱ्यांना सदरची रकमांचा परतावा मंजुर करण्याकरीता संबंधित कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन ज्या संस्थेच्या स्तरावरुन आहरीत करण्यात आले आहे , त्या कार्यालय प्रमुख यांना प्राधिकृत्त करण्यात येत आहे .

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर 2 मध्ये जमा करावयाच्या हप्त्यांच्या रकमा ज्या कार्यालयाकडुन भरणा करण्यात आल्या आहेत त्या कार्यालयोन जमा केलेल्या रकमा व त्यावरील व्याजाची परिगणना व त्याची पडताळणी नियंत्रक कार्यालयाकडुन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .त्याचबरोबर परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना अंतर्गत स्तर – 2 च्या रकमांवर दि.31.03.2022 अथवा परताव्या दिनांक यापैकी जी अगोदर असेल त्या तारखेपर्यंत भविष्य निर्वाह निधीवर वेळोवेळी जाहीर केलेल्या व्याज दरानुसार व्याज देय असणार आहे .

या शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची NPS स्तर -2 मध्ये जमा रकमा व्याजासह लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे . या संदर्भातील कृषी , पशुसंवर्धन , दुग्धविकास व मत्स्य व्यवसाय विभागाचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment