दुधाळ जनावरांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना शासन देत आहे तब्बल 10 लाख रुपये! जाणून घ्या सविस्तर

Spread the love

शेतीपूरक व्यवसायांमध्ये पशुपालन हा फक्त शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा स्त्रोत नसून ग्रामीण भागातील रोजगार निर्मितीचा महत्त्वाचा भाग बनलेला आहे. पशुपालनाचे महत्त्व जाणून घेऊनच शेतकरी वर्गाला आणि खास करून तरुण वर्गाला पशुपालन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी शासन अनेक उपाययोजना राबवत आहे.

ज्या माध्यमातून पात्र व्यक्तींना पशुपालन व्यवसाय करण्यासाठी अनुदान दिले जाते. यासोबतच स्वस्त दरामध्ये कर्ज सुद्धा उपलब्ध करून दिले जाते. दुग्ध व्यवसाय करण्यासाठी शासनाने स्टेट बँक ऑफ इंडिया या संस्थेला योजना राबविण्यासाठी संमती दिलेली असून दुधाळ जनावरे खरेदी करण्यासाठी आणि यासोबत त्यांचा संभाळ करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून पात्र शेतकऱ्यांना दहा लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकते.

SBI बँक देतेय कर्ज

शेतकऱ्यांना त्याच्या प्रकल्प अहवालाच्या आधारावरती एसबीआय बँकेकडून पशुसंवर्धनासाठी योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते लाभार्थी व्यक्तीस एकूण रकमेपैकी दहा टक्के रक्कम मार्जिन मनी म्हणून बँकेत जमा करावी लागते. दहा लाख रुपयांचे कर्ज घेण्यासाठी एक लाख साठ हजार रुपये पर्यंत नॉनमुद्रा कर्ज त्रिपक्षीय करार अंतर्गत लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे

बँक कर्जाची सोय करून देणाऱ्या स्टेट बँकेच्या जिल्ह्यामध्ये तीन किंवा चार शाखा अधिकृत असतील. इच्छुक व्यक्तींनी या शाखांमधून कर्ज उपलब्ध करून घ्यावे. यासाठी पात्र लाभार्थ्यांना अर्ज भरावा लागतो अर्ज सोबतच आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो, मतदान कार्ड, ओळखपत्र, दूध समितीच्या सक्रिय व्यक्तीचे प्रमाणपत्र, यासोबतच त्रिपक्षीय करार इत्यादी कागदपत्रे जोडायचे असतात.

कर्जाची परतफेड

जनावरे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड ही 36 हप्त्यांमध्ये माघारी करावी लागेल याशिवाय दूध समितीमध्ये लाभार्थ्यास दूध पुरवठा करणे बंधनकारक राहील. कर्जाच्या परतफेडची दरमहा एकूण रकमेपैकी 30 टक्के रक्कम ही शासनाच्या सोसायटीकडून बँकेस दिली जाईल.

Leave a Comment