राज्य कर्मचाऱ्यांचे सन 2022 मधील जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदली संदर्भात अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गिमित !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत जिल्हा परिषदेतील शिक्षक संवर्गाच्या सन 2022 मधील जिल्हांतर्गत बदल्यांबाबत ग्रामविकास विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक दि.12.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . सदर परिपत्रकाला राज्य शासनाच्या निर्णयाचे दोन संदर्भ देण्यात आलेले आहेत . ग्रामविकास विभगाकडुन दि.12.10.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्य शासनाच्या दि.07.04.2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरणानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे .सदर शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना विवरण पत्र -1 बदलीस पात्र शिक्षकांनी परिपत्रकामध्ये नमुद निवड प्राधान्यक्रम करायचे आहे , ज्या शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहणार असल्याची तरतुद नमुद आहे .जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत दि.07.10.2022 रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित करण्यात आलेली होती .सदर बैठकीच्या अनुषंगाने विवरण पत्र 1 बदलीस पात्र शिक्षक बाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत .

सदर बदली पुर्णत : प्रशासकीय असल्याने शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही . मात्र जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र – 1 मध्ये नमूद केलेला उक्त आ ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकणार आहे .या संदर्भातील ग्रामविकास विभागाचा दि.12.10.2022 रोजीचा सविस्तर परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .

शासन परिपत्रक

Leave a Comment