केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना डी.ए मध्ये चार टक्के वाढ करुन खुश करण्यात आले होते , यानंतर आता दिवाळी अगोदरच वेतनामध्ये 12 टक्के त्याचबरोबर मागील 5 वर्षांपासुनचे महागाई भत्ता थकबाकी अदा करण्यास अखेर केंद्र सरकारकडुन मंजुरी देण्यात आलेली आहे .सदरची वेतनवाढ व डी.ए थकबाकी केंद्र सरकारच्या अधिनस्त असणाऱ्या 4 जनरल विमा कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत सार्वजनिक क्षेत्रातील 4 जनरल विमा कंपनी मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या औचित्य साधून सदर कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 12 टक्के वाढ करण्यासा केंद्रीय वित्त मंत्रालयाकडुन मंजुरी देण्यात आलेली आहे .सदरची वाढ कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2017 पासुन अनुज्ञेय करण्यात आल्याने 2017 पासून थकबाकी कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणार आहे .2017 पासुन वेतन व डी.ए थकबाकी अदा करण्यासाठी वित्त मंत्रालयाकडुन विशेष निधीची तरतुद करण्यात येणार आहे .यामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे 8,000/- करोड रुपयांचा अतिरिक्त बोझा वाढणार आहे .
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही लाभ !
ऑगस्ट 2017 पासून जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत , अशा कर्मचाऱ्यांना 12 टक्के वेतनवाढीस वाढीव डी.ए चा लाभ अनुज्ञेय करणेबाबत , केंद्र शासनाकडुन निर्देश देण्यात आलेले आहेत .यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील न्यु इंडिया विमा कंपनी , यूनाइटेड इंडिया विमा कंपनी ,तसचे दि ओरएंटल विमा कंपनी या चार विमा कंपनीचा समावेश होतो .या कंपनीमधील कर्मचाऱ्यांना सदरचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !