सर्वसामान्य लोकांची आशा असते कि , आपणही एखादी कार खरेदी करावी . परंतु कारच्या किंमतीमुळे त्यांची कार खरेदी करण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहुन जातात . परंतु कार उत्पादक कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या अपेक्षांच्या व आर्थिक परिस्थितीनुसार कमी किंमतीमध्ये चांगल्या फिचरसह कार उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत .5 लाखांपेक्षा कमी किंमतीमध्ये कोणकोणत्या कार मिळतात , ते आपण पुढीलप्रमाणे पाहुयात .
1.मारुती सुझुकी अल्टो ( Maruti Suzuki Alto )
मारुती सुझुकी अल्टो ही कार भारतामध्येच नव्हे तर विदेशामध्ये देखिल खुप लोकप्रिय आहे . या कारची खास वैशिष्ट्ये म्हणजे या कारची कमी किंमत व जास्त मायलेज त्याचबरोबर या कारचा मेंटनेस चार्जेस खुपच कमी आहे .यामुळे सर्वसामान्य लोकांना ही कार खुप परवडणारी आहे , ही कार सीएनजी व्हेरिअंटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे .या कारला 22.05 किलोमीटर प्रती लिटर मायलेज आहे , तर सीएनजी व्हेरिएंटमध्ये 31.59 किलोमीटर प्रती किलो मायलेज आहे . यामुळे या कारला मोठ्या प्रमाणात मागणी आहे . या कारवर दिवाळी सणानिमित्त विशेष ऑफर देण्यात आली आहे . ती म्हणजे ही कार आपण केवळ 65,000/- रुपये भरुण घरु घेवून जावू शकता . उर्वरित रक्कम प्रिमियमद्वारे भरु शकता . या कारची एक्स शोरुम किंम 2.94 लाख रुपये आहे .

2. रेनॉल्ड ( RENAULT KWID )
ही कार मारुती सुझुकी अल्टो कारचा स्पर्धक म्हणुन बाजारात उतरवण्यात आली आहे . यामध्ये मारुती अल्टो पेक्षा मोठे अडव्हांस फिचरस देण्यात आलेले आहेत . जसे कि अल्टोपेक्षा या कारची उंची जास्त आहे , शिवाय या कारचे सिट हे अल्टोपेक्षा चांगले आहेत . यामुळे लांब पल्याच्या प्रवासाला या कारने प्रवास केल्यास त्रास होत नाही .दुसरे म्हणजे या कारला कंपनी मायलेज हे 22 किलोमीटर प्रती लिटर आहे .तर या कारची एक्स शोरुम प्राईस 2.94 लाखापासुन सुरुवात होते .यामुळे अल्टो कार व रेनॉल्ड कारने फिचरचा विचार करुन या कारची निवड करु शकता .या कारवर दिवाळी सणानिमित्त खास ऑफर सुरु आहेत , ही कार आपण केवळ 80,000/- रुपये भरुण घरी घेवुन जावू शकला . उर्वरित रक्कम प्रमियमद्वारे भरु शकता .

3. मारुती सुझुकी S-PRESSO
मारुती कंपनीने मारुती अल्टोसारखीच पण काही अडव्हांस फिचर टाकुन S-PRESSO या कारची निर्मिती केली आहे . या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या कारमध्ये जास्त स्पेस मिळतो व कारची किंमत देखिल कमी आहे .शिवाय ही कार सिएनजी व्हेरिएंट मध्ये देखिल उपलब्ध आहे . या कारची मायलेज क्षमता 21.4 किलोमिटर प्रती लिटर , तर सीएनजी व्हेरिएंट मध्ये 31.2 किलोमीटर प्रती किलोग्रॅम आहे .यामधील बेसिक मॉडेलची किंमत 3.70 लाखांपासून सुरुवात होते .ही कार दिवाळी सणानिमित्त घरी घेवून जाण्याचा विचार करत असाल तर केवळ एक लाख रुपये डाऊन पेमेंट करुन ही कार घरी घेवून जावू शकाल , उर्वरित रक्कम हप्त्याद्वारे भरु शकता .

- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !