सध्या खरीप हंगामातील पिकांची काढणी सुरू आहे आणि काहीच दिवसांमध्ये ही काढणी पूर्ण होईल. प्रामुख्याने खरीप हंगामामध्ये घेतली जाणारी पिके म्हणजे सोयाबीन व कापूस. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्याला या दोन्ही पिकाबाबत चढ-उतार पहायला मिळत आहे. ज्याचा कुठे ना कुठे फटका हा भारतातील बाजारपेठेवरती सुद्धा होत आहे. ह्या अनुषंगाने आता बाजारात येत असलेल्या सोयाबीन आणि कापूस यांच्या दरावरती नक्की काय परिणाम होऊ शकतो. यासोबतच यंदाच्या काळात सोयाबीन आणि कापसाच्या दराची स्थिती नक्की काय असेल. याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
कसे असतील कापसाचे दर ?
कापसाला सध्या चांगला दर मिळत आहे. ऑक्टोंबर नोव्हेंबर महिना हा कापूस विक्रीसाठी महत्त्वाचा असतो. कारण बाजारामध्ये या काळात नवा कापूस दाखल होतो. त्यामुळेच बाजारामध्ये कापसाची आवक यादरम्यान वाढत असते. बाजारांमध्ये कापसाची आवक वाढली की उद्योजक कापूस खरेदीसाठी मार्केटमध्ये उतरतात. कापसाची आवक बाजारामध्ये वाढली की दर थोडेफार नरमतात. अमेरिकेमध्ये आता कापसाचे उत्पादन सुद्धा घटलेले आहे. त्यामुळे भारतातील कापूस दरवाढीस अशावेळी चांगलेच प्रोत्साहन मिळू शकते. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये. मार्केट मधील योग्य तो दर पाहूनच कापसाचे विक्री करावी.
कापसाची दरवाढ नक्की कधी होऊ शकते असा अंदाज घेऊनच टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री शेतकऱ्यांनी केल्यास त्यांना याचा फायदा होईल. तज्ञ लोकांच्या मते यंदा कापसाला कमीत कमी प्रतिक्विंटल मागे आठ हजार ते साडेआठ हजार रुपये दर मिळणे अनिवार्य आहे आणि हाच दर अजून वाढू शकतो. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अशा दराबाबत नक्कीच दिलासा मिळेल.
सोयाबीनचे दराची स्थिती कशी राहील ?
सोयाबीनचे दर मात्र यंदा बाजारात चांगले आहेत. खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक काढणीला आले आहे. बऱ्याच ठिकाणी काढणी सुरू आहे. पण अतिवृष्टीमुळे पिकांचे यंदाच्या वर्षी प्रचंड नुकसान झाले. अजून सुद्धा परतीचा पाऊस चांगलाच पडत असल्यामुळे सोयाबीनच्या काढणीला वेळ पण लागत आहे. अशावेळी सोयाबीन काढल्यामुळे तो ओला निघतो आणि हा ओला सोयाबीन गाळल्यामुळे त्यामध्ये काडी कचरा सुद्धा सापडतो त्यामुळे मार्केटमध्ये अशा सोयीने दर सुद्धा कमी मिळतो. या तुलनेत एकदम वाळलेल्या आणि स्वच्छ सोयाबीनला चांगला दर मिळतो. तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा जास्त घाई करू नये ज्यावेळी मोकळे वातावरण होईल आणि रानांना वापसा येईल अशावेळी सोयाबीन काढून मळून वाळवून ठेवावा आणि मार्केटमध्ये न्यावा. मग तुम्हाला अशावेळी साधारण भाव मिळू शकतो.
सर्वसाधारणपणे सोयाबीनला यावर्षी बाजारपेठेमध्ये कमीत कमी प्रतिक्विंटल साडेचार हजार रुपये आणि जास्तीत जास्त पाच हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळू शकतो.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !