SBI : भारतीय स्टेट बॅंकेत 1422 जागेवर पदवी धारकांसाठी नोकरीची मोठी संधी .

Spread the love

भारतीय स्टेट बँक ही सार्वजनिक क्षेत्रातील , राष्ट्रीयकृत्त बँकेपैकी एक अग्रणी बँक आहे . भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये भांडवलाचा विचार केल्यास सर्वात जास्त भागभांडवल बँकेचे आहे . या बँकेत CBO पदांच्या एकुण 1422 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

सर्कल बेस्ड अधिकारी पदांच्या एकुण 1422 जागेंसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून संवर्गनिहाय पदांचे विवरण पुढीलप्रमाणे आहे .

प्रवर्गपदांची संख्या
SC209
ST117
OBC386
EWS138
GEN572
TOTAL1422

पात्रता / वयोमर्यादा –

सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांने कोणत्याही शाखेतील पदवी धारण केलेली असावी . त्याचबरोबर बँकेतील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक राहील . शिवाय सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.30.09.2022 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षाच्या दरम्याने असणे आवश्यक आहे . मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे तर इतर मागासप्रवर्गाकरीता 3 वर्षे सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया –

सदर पदांकरीता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे , ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 01.11.2022 असेल . त्यामुळे वरील नमुद पात्रताधारक उमेदवारांने आपला अर्ज विहीत कालावधीमध्ये सादर करायचा आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment