केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 38 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात आलेला आहे , त्याच धर्तीवर राज्य शासन सेवेतील अधिकाऱ्यांना 38 टक्के महागाई भत्ता डी.ए फरकासह लागु करणेबाबतचा सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.18.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा दि.18.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या दि.03.10.2022 च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित करण्यात आलेली आहे .केंद्र शासनाच्या नमुद कार्यालयीन ज्ञापनानुसार दि.01.07.2022 पासुन लागु करण्यात आलेला 4 टक्के वाढीव महागाई भत्ता ( Dearness Allowance ) व ज्ञापनात नमुद इतर तरतूदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील आखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागु करण्यात आले आहेत . यानुसार सदर अधिकाऱ्यांना दि.01.07.2022 पासून 38 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहणार आहे .
या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य संवर्गात कार्यरत आखिल भारतीय सेवेतील कार्यरत अधिकाऱ्यांना जुलै 2022 पासुन वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात आल्याने सदर अधिकाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ होणार आहे . या संदर्भाती सामान्य प्रशासन विभागाचा दि.18.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202210181244270807 ) डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !