राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे पगार व दिवाळी सण अग्रिम अदा करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी !

Spread the love

राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतनासोबत दिवाळी सण अग्रिम अदा करण्यासाठी आता राज्यातील सर्व कोषागार कार्यालयांना निर्देश देण्यात आलेले आहेत .यामुळे आता कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचा पगार दिवाळी सणा अगोदरच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे .

येत्या 21 ऑक्टोंबरपासुन दिवाळी सणाची सुरुवात होत आहे , त्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे वेतन व दिवाळी सण अग्रिमांची रक्कम विहीत वेळेत अदा करणेसाठी राज्यातील कोषागार कार्यालयांचे कामकाज शनिवारी , रविवारी देखिल चालुच होते .कोषागार कार्यालयांकडुन वेतन‍ बिलांची तसेच सण अग्रिमांची तपासणी कामकाज पुर्ण झाल्यानंतर त्वरीत वेतन , दिवाळी ॲडव्हान्स सह कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत .यामध्ये दिवाळी सण अग्रिमांची रक्कम ही गतवर्षांप्रमाणे 12,500/- रुपये रक्कम कायम ठेवण्यात आलेले अहेत .यामध्ये वाढ करण्याची शक्यता होती .परंतु राज्य शासनाकडुन सकारात्मक भुमिका न घेतल्याने कर्मचाऱ्यांना या वर्षी सन अग्रिमाची रक्कम 12,500/- रुपये मिळणार आहे .

ज्या कार्यालयाचे वेतनबिल व अग्रिम बिल तपासुण पुर्ण झाले आहेत , असे बिल 21 ऑक्टोंबर रोजी सीएनपी प्रणालीद्वारे कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन आहरीत करण्यात येईल ,शिवाय पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचे पेन्शन देखिल दिवाळीपुर्वी अदा करण्यात येईल .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाला मोठा आर्थिक हातभार मिळणार आहे .

Leave a Comment