राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेधारक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर 2022 चे माहे नोव्हेंबर , 2022 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करणेबाबत आज दि.18.10.2022 रोजी वित्त विभागाकडुन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .वित्त विभागाचा दि.18.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .
यावर्षी दि.22.10.2022 पासुन दिवाळी सणाची सुरुवात होत असल्याने राज्य शासकीय कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांना सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागु नये यासाठी माहे ऑक्टोंबर , 2022 नोव्हेंबर 2022 मध्ये देय होणारे वेतन / निवृत्तीवेतन दिवाळी सणापूर्वी प्रदान करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .सदर बाब उपरोक्त शासन निर्णयातील परिच्छेद क्र 1 ( 8 ) मधील तरतुद शिथील करुन राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर 2022 या महिन्याचे वेतन / निवृत्तीवेतन दि.21.10.2022 रोजी प्रदान करण्यास राज्य शासनाकडुन मंजुरी देण्यात येत आहे .सदर तरतुदीमुळे महाराष्ट्र कोषागार नियम 1968 च्या खंड 1 मधील 328 मधील तरतुदी देखिल शिथिल करण्यात येत आहेत .
या निर्णयातील तरतुदी राज्य शासनाच्या अधिनस्त जिल्हा परिषद , मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था , कृषी विद्यापीठे / अकृषी विद्यापीठे व त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांचे अधिकारी / कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना देखिल लागु असणार आहे .या संदर्भातील वित्त विभागाचा दि.18.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !