गारपीट व अवेळी पावसाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाची रक्कम थेट बँक खात्यात ! शासन निर्णय निर्गमित ,दि.18.10.2022 .

Spread the love

राज्यातील माहे फेब्रुवारी , मार्च व मे 2020 या कालावधीतील गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपाबाबत , राज्य शासनाच्या सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाकडुन महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील सहकार , पणन व वस्त्रोद्योग विभागाचा दि.18.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यात माहे फेब्रुवारी , मार्च , एप्रिल व मे 2022 या कालावधीत गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले होते , सदर लाभ प्राप्त शेतकऱ्यांना निधीचे वाटप करताना विविध दक्षता घेण्याचे महसूल व वन विभागाच्या वाचा येथील क्रमांक 2 अन्वये निर्देश देण्यात आलेले आहेत .गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिके व बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी वाटप केलेली मदतीची रक्कम खातेदारांच्या बँक खात्यावर जमा करताना मदतीच्या रक्कमेमधून कोणत्याही बँकेने कोणत्याही प्रकारची वसूली करु नये असे आदेश देण्यात आलेले आहेत .सरदची नुकसानी वाटपांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे .

सदर नमुद नुकसानीसाठी मदत वाटपासाठी आवश्यक निधींचे वाटप सहकार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार बँकेला वाटप करण्यात आला आहे .महसुल विभागाने दिलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या प्रमाणानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सदर मदत वाटपाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे .शेतकऱ्यांना नुकसानीची मदत किती मिळेल यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करु शकता .

शासन निर्णय

Leave a Comment