राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . यामुळे ऐन दिवाळी सणाच्या मुहुर्तावर कर्मचाऱ्यांसाठी मोठी निराशा येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली सवलत अखेर रद्द होण्याची चिन्हे समोर येत आहेत .या संदर्भातील नेमकी सविस्तर बातमी काय आहे , सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुट्टी होती .परंतु तत्कालिन मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी राज्य शासनाच्या मंत्रालयासह सर्व कार्यालयीन कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यास मान्यता देण्यात आली आहे . या निर्णयावर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुनर्विचार करुन पाच दिवसांचा आठवडा रद्द करण्याची शक्यता वर्तविली जात आहे . कारण मंत्रालयामध्ये कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा झाल्याने , कामाच्या तासांपेक्षा जास्त तास काम करावे लागत आहे . यामुळे महिला कर्मचाऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेवून अडचणी सांगितल्या आहेत .
शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून नोकरभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्याने कामाचा बोजा मोठ्या प्रमाणात येत असल्याने , सरकारकडुन कामाचा पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता आहे .आता पुर्वीप्रमाणे शनिवारी देखिल मंत्रालयासह सर्व शासकीय कार्यालये सुरु हाेतील .यामुळे कर्मचाऱ्यांना तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेली सुट्टीची सवलत रद्द होण्याच्या मार्गावर आहे .
अशा प्रकारचे वृत्त ,दैनिक वृत्तामार्फत देण्यात आले होते ,या वृत्ताचे खंडण करणेसंदर्भात पत्र निर्गमित झाले आहे .याबाबतचे सविस्तर पत्र पुढीलप्रमाणे आहे.

- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !