राज्य कर्मचाऱ्यांची सन 2022 मधील बदली प्रक्रियेबाबत अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ! दि.20.10.2022

Spread the love

सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत अखेर राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे .या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडुन दि.20.10.2022 रोजी एक शासन परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे . या संदर्भातील ग्रामविकास विभागाचा दि.20.10.2022 रोजीचा सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील जिल्हा परिषद ( ZP ) प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भ क्र.1 येथील दिनांक 07.04.2021 च्या शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आले आहे .सन 2022 मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक 31 मे ऐवजी दिनांक 30 जून 2022 पर्यंत करण्यास संदर्भ क्र.2 येथील दिनांक 04.05.2022 च्या शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे .तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी संदर्भ क्र.3 येथील दिनांक 29.06.2022 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे .

उक्त दिनांक 04.05.2022 आणि दिनांक 29.06.2022 च्या शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन 2022 मध्ये होणाऱ्या बदल्यांकरीताच लागु असणार आहे .सन 2022 मधील ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे . सदर वेळापत्रक पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन ग्रामविकास विभागाचा शासन परिपत्रक डाऊनलोड करु शकता .

शासन परिपत्रक

Leave a Comment