Old Pension : जुनी पेन्शन योजना लागु करण्याच्या निर्णयाचे राज्य कर्मचाऱ्यांकडुन स्वागत !

Spread the love

देशातील बहुतांश राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी केंद्र सरकार पुरस्कृत्त राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . परंतु या पेन्शन योजनेमध्ये जुन्या पेन्शनप्रमाणे लाभ मिळत नसल्याने सर्वच राज्यातील कर्मचारी जुनी पेन्शन योजनेची मागणी करु लागले आहेत . पंजाब राज्य सरकारचे मुख्यमंत्री भागवंत मान यांनी राज्य कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सणानिमित्त जुनी पेन्शन लागु करुन मोठी भेट जाहीर केली आहे .

पंजाब राज्य सरकारने सन 2004 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्यात आलेली होती . सदर योजनेस पंजाब सरकारी कर्मचाऱ्यांकडुन मोठा विरोध होत होता . पंजाब राज्याची विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीवेळी आप पक्षाने कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले होते कि , आम आदमी पार्टीची सत्ता आल्यास पंजाब राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात येईल . याच आश्वासनाची पुर्तता मुख्यमंत्री भागवंत मान यांनी ट्वीट करुन राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने जुनी पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा केली आहे .

2004 नंतर जे कर्मचारी पंजाब शासन सेवेत रुजु झालेले आहेत त्याचबरोबर जे कर्मचारी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेमध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत . अशा कर्मचाऱ्यांना देखिल जुनी पेन्शन प्रमाणे इतर सर्व लाभ लागु करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्याची घोषणाा केली आहे . या निर्णयाचे पंजाब राज्य कर्मचाऱ्यांकडुन त्याचबरोबर इतर राज्यातील कर्मचाऱ्यांकडुन देखिल स्वागत केले जात आहेत .

Leave a Comment