पिकांचं नुकसान झाले तर अशा प्रकारे पीकविमा योजनेकडे करा तक्रार , नाहीतर मिळणार नाही पीकविमा ! पहा कशी कराल तक्रार…

Spread the love

पंतप्रधान पिक विमा योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत त्यांनी विमा संरक्षण पिकाचे क्षेत्र स्थानिक नैसर्गिक आपत्ती यासोबतच काढणी पश्चात जे काही नुकसान झाले आहे, याची संपूर्ण माहिती नुकसान झाल्यास निसर्गिक आपत्तीमुळे घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसान झाली आहे याबाबत पूर्वसूचना विमा कंपनीस देणे आवश्यक आहे. तरच विमा कंपन्या पुढील प्रक्रिया सुरू करतील.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करत असताना काही ठराविक बाबी लक्षात घेऊनच तक्रार दाखल करावी. असे आवाहन कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे. संतोष डाबरे असे म्हणत आहेत की मका, ज्वारी, सोयाबीन या पिकांचे यासोबतच अशा पिकाचे नुकसान झाले असल्यास. शेतकरी बंधू-भगिनींनी क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन वरती नुकसान बाबत तक्रार दाखल करत असताना काढणी पश्चात नुकसान या जोखीमेच्या बाबी अंतर्गत जी काही तक्रार असेल ती तक्रार दाखल करून पिकांची स्थिती नमूद करणे अनिवार्य राहील.

नुकसानीची माहिती भरतेवेळी घ्या ही काळजी :

क्रॉप इन्शुरन्स एप्लीकेशन वरती गेला की तुम्हाला त्या ठिकाणी दोन पर्याय दिसतील. पहिला पर्याय म्हणजे Standing Crop Harvested आणि दुसरा पर्याय म्हणजे Cut & Spread Bundled For Drying आता या दोन पर्यायापैकी Cut & Spread / Bundled For Drying हा पर्याय निवडावा त्या ठिकाणी निवडायचा आहे. आणि पुढील प्रक्रिया करायचे आहे.

तक्रार करत असताना एकूण क्षेत्रापैकी शंभर टक्के क्षेत्र त्या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे .कापूस यासोबतच तूर या पिकांचे नुकसान झाले असल्यास स्थानिक आपत्ती या माध्यमातून तक्रार दाखल करावी .नुकसान झालेली टक्केवारी ही प्रत्यक्षपणे नुकसानीच्या प्रमाणात नमूद करणे आवश्यक आहे .प्रत्येक गटामधील प्रत्येक स्वतंत्र पिकासाठी स्वतंत्रपणे तक्रार करणे आवश्यक असणार आहे .तक्रार झाली की प्रत्येक तक्रारी अंतर्गत स्वातंत्र्य तक्रार क्रमांक शेतकऱ्यांच्या मोबाईल नंबर वरती वितरित करण्यात येईल . नुकसानग्रस्त पिकाची तक्रार करत असताना काही अडचणी आल्या तर अशावेळी तुम्ही थेट तुमच्या तलाठीशी संपर्क करावा .

Leave a Comment