State Employee : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित !

Spread the love

राज्य कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनातुन कपात झालेली रक्कम व शासनाचा देय हिस्सा यांच्या हिशोबाच्या पावत्या देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांचे दि.17.10.2022 रोजी एक महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित झालेले आहे . या संदर्भात दि.17.10.2022 रोजी निर्गमित झालेला सविस्तर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेतुन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत समाविष्ट करण्याची कार्यपद्धती शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि.19.09.2019 अन्वये विहीत करण्यात आलेली आहे .राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असलेल्या सर्व जिल्हा परिषद तसेच मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे राष्ट्रीय निवृत्तीवेतन क्रमांक सुरु करणे , नियमित कपात करणे , कपात केलेली रक्कम संबंधितांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन खात्यावर जमा करण्यात येणार आहे .

परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेचा हिशोब पूर्ण करुन सदरची रक्कम संबंधितांच्य कायम निवृत्तीवेतन योजनेचा हिशोब पूर्ण करुन सदरची रक्कम संबंधितांच्या कायम निवृत्तीवेतन ( PRAN ) खात्यावर जमा करणे इत्यादी बाबींचे कार्यवाही 31 मार्च 2022 पुर्वी करुन या बाबींसाठी मंजूर असलेली तरतुद खर्च करणेबाबतच्या कार्यवाहीबाबत वेळोवेळी क्षेत्रिय कार्यालयांना संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आले आहेत .

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये वर्ग लेखाशिर्ष 83420275 मधील सन 21-22 मंजूर तरतुद 3270 कोटी असताना खर्च 40 कोटी झालेला ओ . या बाबींसाठी शासनाने संदर्भिय पत्र क्र. 8 अर्धशासकीय पत्राद्वारे तीव्र नाराजगी व्यक्त केलेली आहे . व सदरील हिशोब तात्काळ पुर्ण करणेबाबत राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना कळविण्यात आले आहे . या संदर्भातील दि.17.10.2022 रोजीचा सविस्तर परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लि करा .

शासन परिपत्रक

Leave a Comment