New Update : तरुण वर्गाला व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळणार 1 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज : मंत्री महोदयांनी दिली महत्त्वाची माहिती !

Spread the love

नमस्कार मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे महाराष्ट्र सोबतच संपूर्ण भारत देशामध्ये बेरोजगारीची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आर्थिक सहाय्यता म्हणून अण्णासाहेब पाटील लोन म्हणून दहा हजार रुपयांचे कर्ज मिळणार आहे. शासनाने दिलेले हे कर्ज बिनव्याजी कर्ज असणारा सून प्रतिदिन दहा रुपये प्रमाणे परतफेड करावी या अटी वरती कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल.

व्यवसायासाठी annasaheb patil loan सहाय्यक ठरणार

सध्याच्या घडीला वाढत्या स्पर्धेमध्ये कितीही शिक्षण घेतले तरी सर्वांनाच नोकरी मिळणे शक्य नाही अशावेळी तरुण वर्ग मित्र-मैत्रिणींनी काय करावे ह्या गोष्टी वरती विचार करून अनेक मित्र-मैत्रिणींनी विविध व्यवसाय उभा करून चांगल्या प्रकारे ते स्वतःचा व्यवसाय चालवत आहेत. व्यवसाय उभा करण्यासाठी सर्वांकडेच भांडवल उपलब्ध नसते. यासाठी होतकरू तरुणांना या योजनेच्या माध्यमातून व्यवसाय कर्ज मिळत आहे. जेणेकरून ते ह्या कर्जाचा वापर करून अधिक चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतील. त्यामुळे व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण वर्गाला अण्णासाहेब पाटील कर्ज योजना म्हणजे आशेचा किरण बनलेला आहे.

अशाप्रकारे दहा हजार रुपयांचे कर्ज मिळवून कर्जाची परतफेड करावी !

आरक्षण कमी असल्यामुळे मराठा समाजामध्ये बेरोजगार तरुण वर्गाची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. अशा तरुण वर्गाला व्यवसाय करता यावा ह्या उद्देशाने त्यांना दहा हजार रुपये ची रक्कम बिनव्याजी कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि हे बिनव्याजी कर्ज फेडण्यासाठी जे तरुण वर्ग हे कर्ज घेतील त्यांनी प्रतिदिन फक्त दहा रुपये जमा करून कर्ज फेडावे. म्हणजे आता अगदी सुलभ पद्धतीने कर्ज सुद्धा फेडता येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरुण वर्गाला छोटा मोठा व्यवसाय करण्यास वाव मिळणार आहे.

अशाप्रकारे 50 हजार रुपयांचे कर्ज मिळवून कर्जाची परतफेड करावी !

ज्यावेळी व्यावसायिक वेळोवेळी दहा हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड करतील त्यानंतर अशाच पद्धतीने 50 हजार रुपयांचे कर्ज होतकरू तरुण वर्गाला मिळणार आहे. यामुळे अनेक तरुणांना आणखी चांगल्या प्रकारे व्यवसाय वाढवण्यास चांगलीच मदत होणार आहे. ज्यावेळी तरुण वर्ग 50000 रुपयाचे कर्ज घेतील त्यावेळी परतफेड करताना प्रतिदिन 50 रुपये असा परतावा करावा लागेल. म्हणजे किती सोप्या पद्धतीने शासनाने उपाययोजना राबवून तरुण वर्गाला मदत केली आहे हे या योजनेच्या माध्यमातून दिसून येत आहे.

अशाप्रकारे 1 लाख रुपयांचे कर्ज मिळवून कर्जाची परतफेड करावी !

ह्या मागोमाग ज्या तरुण वर्गाने 50 हजार रुपयांचे कर्ज सुद्धा वेळोवेळी फेडले आहे, अशा तरुण वर्गाला एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज शासन या योजनेच्या माध्यमातून देणार आहे. एक लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज घेतल्यानंतर हे कर्ज परत फेड करण्यासाठी प्रतिदिन शंभर रुपये ह्याप्रमाणे हे एक लाख रुपयांचे कर्ज फेडायचे आहे. त्यामुळे तरुण वर्गांना उद्योग करण्यास चांगलीच मदत मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत अशा जवळपास दहा हजार घटकांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल .अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज घेण्यासाठी यामागे वयोमर्यादा आहे 45 वर्षापर्यंत होती पण आता त्यामध्ये वाढ करून ती मर्यादा 60 वर्षापर्यंत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तर शेतकरी बंधू-भगिनींनो तुम्ही व्यवसाय करू इच्छिणार असाल, तर तुम्हाला आता कर्ज मिळणे सर्वाधिक सोपे होणार असून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आण्णा साहेब पाटील महामंडळ मार्फत हे कर्ज आपल्याला उपलब्ध करून दिले जाईल. तरी सर्वांनी याचा लाभ घेऊन आपल्या व्यवसायामध्ये वाढ करावी किंवा आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा.

नियमित अपडेटसाठी Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा .

Leave a Comment