NPS : कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रीय पेन्शन ( NPS ) योजनेमध्ये मोठे बदल !

Spread the love

राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी , सरकारकडुन राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे .यामध्ये प्रमुख चार बदल करण्यात आले आहे , यामुळे एनपीएस खात्यामध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .या योजनेमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आले आहेत . याबाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .

ई – नामांकन प्रोसेस मध्ये बदल –

सेवानिवृत्तीनंतर पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने सरकारी त्याचबरोबर कॉर्पोरेट विभागातील योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ई- नामांकन प्रोसेसमध्ये सुधारणा करण्यात आली आहे .त्याचबरोबर नोडल अधिकारी एका वेळेस ई- नामांकन करण्याची विनंती स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय या प्रोसेस मध्ये पर्याय उपलब्ध असेल .शिवाय नोडल अधिकारीने विनंतीवर 30 दिवसांच्या आत कोणतीही कारवाई केली नाही तर , केंद्र स्तरावरील रेकॉर्ड किंपींग एजन्सीमध्ये विनंती स्विकारली जाईल . यामुळे एनपीएस मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे .

क्रेडिट कार्डद्वारे योगदान नाही –

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये मध्ये टायर – 2 मध्ये यापुढे क्रेडीट कार्डचा वापर करुन योगदान देवू शकणार नाहीत .पेन्शन फंड आणि विकास प्राधिकाराणे दि.03.08.2022 पासुन क्रेडिट कार्डद्वारे योगदान देण्यास बंदी घातली आहे .याबाबत PFRDA कडुन एक परिपत्रक जारी करण्यात आले असून सर्व POPs ला NPS च्या टायर – 2 खात्यामध्ये योगदान देण्यासाठी क्रेडीट कार्ड स्विकारणे बंद करण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे , मात्र ही सेवा टायर – 1 साठी पुर्वीप्रमाणे सुरु असणार आहे .

ॲन्युइटी योजनेसाठी यापुढे एकच अर्ज

या यापुढे पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना पेन्शन कॉर्पसमधून बाहेर पडण्यासाठी वेगळ्या प्रस्तावाचा अर्ज भरण्याची कोणतीही आवश्यक असणार नाही .यापुढे इक्झिट अर्ज विमा कंपन्या प्रपोजल अर्ज मानतील .या अगादेर पेन्शनधार कर्मचाऱ्यांना एक्झिट अर्ज पेन्शन फंड रेग्युलेटरकडे सबमिट करावा लागत होता . यापुर्वी ही प्रक्रिया अवघड होती , यामध्ये सुधारणा केल्याने कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया सोपी झाली आहे .

डिजिटल जिवन प्रमाणपत्र –

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना भारतीय विमा आणि विकास प्राधिकरण ने यापूर्वी डिजिटल जिवन प्रमाण ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची परवानगी दिली आहे .यामुळे निवृत्तीवेतनधारकांना ही प्रक्रिया अत्यंत सहज व सोपी झाली आहे .

Leave a Comment