राज्य शासन सेवेत कार्यरत सर्व शासकीय , जिल्हा परिषद , इतर पात्र कर्मचारी व सेवानिवत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन दिवाळी सणापुर्वी अदा करणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन दि.18.10.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .सदर शासन निर्णयान्वये राज्य कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन 21 ऑक्टोंबर पर्यंत अदा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते .
वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन / पेन्शन दिवाळी सण अग्रिमसह अदा करण्यात आलेले आहेत . परंतु दि.21.10.2022 रोजी शुक्रवार होता , तर ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन बिल अपुरे त्याचबरोबर राज्यातील काही विभागातील कार्यालयांना पुरेशी निधी उपलब्ध नसल्याने सदर आहरण संवितरण कार्यालयांना शुक्रवारी 2 वाजेनंतर निधी वितरीत करण्यात आला आहे . शनिवारी पासुन बँकेच्या कामकाजाला सुट्या सुरु झाल्याने बऱ्याच कर्मचाऱ्यांना दि.21.10.2022 पर्यंत वेतन / पेन्शन अदा करण्यात आले नाहीत .
शिवाय शनिवार पासुन पुढील सहा दिवस बँकेला सुट्टी जाहीर झाल्याने , बँकेचे कामकाज दि.28.10.2022 पासुन सुरु होणार असल्याने ज्या कर्मचाऱ्यांचे वेतनाचे कामकाज रखडले आहेत .अशा कर्मचाऱ्यांना दिवाळी सण पगार तसेच सण अग्रिमाविनाच साजरा करावा लागणार आहे . निधीचा पुरवठा योग्य वेळेत न झाल्याने , शासन निर्णय निर्गमित होवूनही काही कर्मचाऱ्यांना 21 ऑक्टोंबर पर्यंत पगार झालेला नाही .
- एक मुलगी असेल तर प्रशासन देणार तब्बल 1 लाख रुपये; दोन मुली असतील तर किती पैसे मिळतील? पहा सविस्तर आणि अर्ज करा !
- राज्य सरकारकडुन कर्मचारी बदली धोरणांमध्ये बदल ! जाणून नविन धोरण नेमके कसे असणार
- पेन्शन संदर्भात अभ्यास समितीस कर्मचारी संघटनांकडून सादर करण्यात आलेले मुद्दे !
- Employee Pension : जुनी पेन्शनच्या प्रश्नांवर तीन पर्यायी उपाय ! जाणून घ्या सविस्तर माहीती !
- राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागू करणेबाबत, राज्य सरकारकडून बैठक आयोजित !