छत्तीसगढ राज्य सरकारने जुनी पेन्शन याेजना लागु केलेल्या निर्णयामध्ये , या आहेत प्रमुख तरतुदी .

Spread the love

छत्तीसगढ राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांना 27 आक्टोंबर 2004 पासुन राष्ट्रीय निवृत्तीवेतन ( NPS ) योजना लागु करण्यात आली होती . सदरची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना छत्तीसगढ राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या प्राधिकार राजपत्राद्वारे रद्द करुन जुनी पेन्शन योजना पुर्ववत करण्यात आली आहे . यामध्ये काही तरतुदी देण्यात आलेल्या आहेत . सविस्तर तरतुदी / नियमावली पुढीलप्रमाणे आहेत .

छत्तीसगढ राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन कपात होणारी 10 टक्के रक्कम दि.01.04.2022 पासुन समाप्त होईल .त्याऐवजी भविष्य निर्वाह निधी योजनेच्या नियमानुसार मुळ वेतनाच्या कमीत कमी 12 टक्के कपात करण्यात येईल . सदरची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात येईल .नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह खाते उघडण्यासाठी विशेष भविष्य निर्वाह निधी समिती गठीत करण्यात येवून , कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या खात्यात जमा रक्कम कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये वर्ग करण्यात येईल .या रक्कमेवर व्याज देखिल अनुज्ञेय करण्यात येईल .

कर्मचाऱ्यांची एनपीएस खात्यामध्ये जमा रक्कम छत्तीसगढ सामान्य भविष्य निधी खाते मध्ये समाविष्ठ करण्यात येईल .राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागु असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नियमानुसार सेवानिवृत्त झाले असतील किंवा मृत्यु झाला असेल अशा सर्व कर्मचाऱ्यांना / वारसांना जुनी पेन्शनचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .कर्मचाऱ्यांच्या मृत्यु प्रकरणे जुनी पेन्शनप्रमाणेच सर्व लाभ कर्मचाऱ्यांच्या वारसांना देण्यात येईल तर , वारसांना कुटुंबनिवृत्तीवेतनाची देखिल तरतुद यामध्ये नमुद करण्यात आली आहे .

छत्तीसगढ राज्य सरकारचा सविस्तर राजपत्र पुढीलप्रमाणे पाहु शकता .

Leave a Comment