शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! गाईंचे संगोपन करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे 20 हजार रुपये .

Spread the love

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाय योजना राबवत असते. सध्या राज्य सरकार देशी गाईच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यता म्हणून प्रोत्साहन देत आहे. विविध जातींच्या देशी गाई खरेदी करण्यासाठी शासन 5000 रुपयांपासून 20000 रुपयांपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना देत आहे.

ग्रामीण भागामध्ये पशुपालन हे उत्पन्नाचे मोठे साधन असून शेतकरी गाई, म्हशी, शेळ्या यांचे संगोपन करून चांगला नफा मिळवत आहेत. दूध व्यवसायातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासाठी शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे. स्वतःचे दूध व्यवसाय स्टार्टअप सुरू करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना अनुदान व कर्ज सुविधा सुद्धा देत आहे.

राज्यामध्ये यासोबतच देशांमध्ये बरेच शेतकरी पशुपालनावर अवलंबून आहेत. गाई म्हशींचे संगोपन करून दूध व्यवसाय करून शेतकरी चांगला नफा कमवत आहेत. या माध्यमातून शासन सुद्धा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. विविध जातीच्या गाईंच्या खरेदीसाठी शासन 5000 ते 20,000 प्रोत्साहन रक्कम म्हणून देत आहे.

देशी भारतीय वंशीय गायी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गाई आहेत

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की भारतामध्ये अशा सुद्धा देशी गायी आहेत ज्यांचे संगोपन करून तुम्ही एका गाईपासून दिवसाला पंधरा ते वीस लिटर दूध मिळू शकता. अशी क्षमता असलेल्या गाईंची तुम्ही व्यवस्थितपणे निगा राखून व चारा पाण्याचे योग्य प्रकारे नियोजन करून शेतकरी खरोखर फायदेशीर दूध व्यवसाय करू शकतील.

येथे अर्ज करा

शेतकरी गो-संवर्धन व संरक्षण कार्यक्रमाच्या अंतर्गत या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तर इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाला भेट देऊन त्या ठिकाणी योग्य ती माहिती घेऊन अर्ज करावा.किंवा  http://pasudhanharyana.gov.in/schemes या संकेतस्थळावर अर्ज केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पात्र ठरत असाल तर शासन तुम्हाला अनुदानातून प्रोत्साहन देईल.

Leave a Comment