दिवाळी सणामध्येच कर्मचाऱ्यांनी पुकाराला संप ! या आहेत प्रमुख मागण्या ?

Spread the love

सध्या दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे , दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्यातील अराजपत्रिक कर्मचाऱ्यांना 12,500/- रुपये दिवाळी सण अग्रिम तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना 22,500/- रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आले आहे .तर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी सणाला बोनस म्हणुन शिंदे सरकारने मंजुरी देण्यात आलेली आहे . या निर्णयानुसार अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिम व बोनसचा लाभ मिळालेला आहे .तर काही कर्मचाऱ्यांना बँकाना सुट्या असल्याने विलंब होत आहे .

कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळी पुकारला संप –

बेस्ट मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळी सणामध्ये संप पुकारला आहे , यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे .या कंत्राटी कर्मचाऱ्यांना इतर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवाढ व दिवाळी बोनस न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसुन आल्याने , कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे .शिवाय त्यांच्या या मागण्या पुर्ण होईपर्यंत संप सुरु राहणार असल्याची माहीती संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली आहे .सरकारच्या कामगार नियमाप्रमाणे समान काम समान वेतन या कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळत नाही . यामुळे या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे .

बेस्ट मधील कार्यरत कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करतात , यामुळे या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन घेण्याचा अधिकार आहे . शिवाय यामध्ये अनेक कंत्राटी कर्मचारी  मागील 10 ते 15 वर्षांपासुन काम करत आहेत . यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे .निदान पगारामध्ये वाढ करुन देणे तरी आवश्यक आहे . जेणेकरुन कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह भागेल .

Leave a Comment