राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांसाठी पगार – पेन्शन बाबत आत्ताची मोठी अपडेट ! वित्त विभागाचा शासन निर्णय .

Spread the love

राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन दिवाळी सणापुर्वी अदा करणेबाबत वित्त विभागाचा दि.18.10.2022 रोजी शासन निर्णय निर्गमित झालेला आहे . परंतु या शासन निर्णयानुसार बहुतांश कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये वेतन / पेन्शनची रक्कम आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये मोठा संताप निर्माण झालेला आहे . कारण शासनाकडुन शासन निर्णय निर्गमित होवून कर्मचाऱ्यांना वेतनाची रक्कम बँक खात्यात आली नाही .

सध्याच्या घडीला राज्यातील सर्वच कोषागारांना कर्मचारी वेतनासाठी पुरेशी वेतनाची निधी वितरीत करण्यात आलेली आहे . यामध्ये कर्मचाऱ्यांना देय असणारे दिवाळी सण अग्रिमासाठी आवश्यक निधीची तरतुद देखिल राज्य शासनाकडुन करण्यात आलेली आहे .बँकेला दि.26.10.2022 पर्यंत सुट्या असल्याने , कर्मचाऱ्यांना 27.10.2022 रोजी वेतनाची / पेन्शनची रक्कम बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे .यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी सण झाल्यानंतर वेतन / पेन्शनचा लाभ मिळणार आहे .दिवाळी सण दि.26.10.2022 पर्यंतच असल्याने , कर्मचाऱ्यांना सणासाठी आर्थिक तडजोड करावी लागणार आहे .

ऑक्टोंबर महिन्याच्या अखेर राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना वेतन / पेन्शनची रक्कम बँक खात्यात वर्ग करण्यात येईल .शासन निर्णय उशिरा निर्गमित झाल्याने , कर्मचाऱ्यांना वेतन / पेन्शनचा लाभ वेळेत मिळाला नाही .परंतु आता बँक सुरु झाल्यास , माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन / पेन्शन कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल .यासाठी पुरेपुर निधींचे वितरण राज्य शासनाकडुन करण्यात आलेले आहे .

Leave a Comment