या भत्तामध्ये सुधारणा करणेबाबतच्या निर्णयाला राज्य शासनाची मंजुरी ! GR दि.27.10.2022

Spread the love

महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांना सुधारित दराने गणवेश भत्ता मंजुर करणेबाबतचा गृह विभागाचा एक महत्वपुर्ण शासन निर्णय दि.27.10.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील गृह विभागाचा दि.27.10.2022 रोजीचा शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

महाराष्ट्र संवर्गामध्ये भारतीय पोलिस सेवेतील अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्ताबाबत खर्च सदरचे अधिकारी 2055, पोलिस या मुख्यलेखाशिर्षा अंतर्गत कार्यरत असलेल्या ज्या गौण – लेखाशिर्ष व उपशिर्ष घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर कार्यरत आहेत त्या गौण व उपशिर्षाखालील पोलिस घटक कार्यालयास 01 वेतन या तपशिलवार शिर्षाखाली मंजुर अनुदानातुन भाविण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत . यासाठी संबंधित त्या विभागातील आहरण व संवितरण अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहेत .

तसेच महाराष्ट्र संवर्गातील भारतीय पोलिस सेवेतील जे अधिकारी इतर विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असतील त्यांनी त्या विभागाच्या / कार्यालयाच्या वेतन व भत्ते यासाठीच्या तरतुदीतुन सदरचा खर्च अदा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . या संदर्भातील गृह विभागाचा दि.27.10.2022 रोजीचा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment