दिवाळीच्या काळातही सुद्धा सोयाबीनची काढणी –
दिवाळीच्या काळात सुद्धा शेतकरी सोयाबीन काढत आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यात कसलाही पाऊस नाही. कमी पावसामुळे सोयाबीनमधील ओलावा कमी होण्यास चांगली मदत होत आहे. देशातील बाजारपेठेत सोयाबीनची आवक आता हळूहळू वाढताना दिसत आहे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा देखील दिसून आली.
सोयाबीनच्या दरांमध्ये सुधारणा होत असताना दिसत आहे..
मराठवाडा, विदर्भ आणि इतर सोयाबीन उत्पादक प्रदेशात पावसामुळे पिकाची गुणवत्ता कमी होऊन त्याचे नुकसान जास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी मळणीनंतर लगेचच सोयाबीन विकण्यास बाजारात येतात. चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे उत्पादन शेतकरी बंदच करत आहेत. या आठवड्यात अनेक बाजार समित्या बंद राहिल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे सोयाबीन शिवारातच विकले. सोयाबीनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने सध्या या मालाची किंमत 4,200 ते 4,600 रुपये प्रति क्विंटल इतकी आहे. दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे शेतकरी सोयाबीन वाळवत/drying आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यापासून जो माल बाजारात येईल त्या सोयाबीनमधील ओलाव्याचे प्रमाण कमी राहणार असल्याचेही शेतकरी व व्यापारी सांगत आहेत. सध्या विकल्या जाणाऱ्या सोयाबीनमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे सोयाबीनचे प्रमाण हळूहळू कमी होत असताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे बाजारातील किमान दरांमध्येही काही प्रमाणात सुधारणा झालेली आपल्याला पाहायला मिळते.
सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठे पहा किती आहे दर..
आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनच्या दरात काहीशी सुधारणा झालेली दिसून येत आहे. सोयाबीनचा भाव १४ डॉलरच्या पातळीवर येऊन पोहोचला आहे. डिसेंबर सोयाबीनचा वायदा आज १४०० सेंट्स प्रति बुशेलवर बंद झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची किंमत $13 ते $14 प्रति बुशेल अशी आपल्याला पाहायला मिळते.आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीन पेंडीचे भाव सुधारले तर देशांतर्गत बाजारालाही मोठा पाठिंबा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे देखील म्हणणे आहे. देशाच्या बाजारपेठे मध्ये सुद्धा सोयाबीनच्या किमान भावात किरकोळ वाढ झाली आहे. एफएक्यू food quality दर्जाच्या सोयाबीनला 5 हजार ते 5 हजार 200 रुपये इतका भाव मिळत आहे.
सोयाबीनच्या सरासरी दरात वाढ –
सध्याची मागणी आणि पुरवठ्याची पस्थिती पाहता येत्या काही दिवसांत सोयाबीनचा सरासरी दरात 5 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळे बाजाराचा आढावा घेऊनच शेतकऱ्यांना सोयाबीन विकणे हे अत्यंत फायद्याचे ठरेल.
- राज्यातील कार्यरत / सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.01.02.2023
- Top Highlights : 2022-23 बजेटमधील टॉप महत्वाच्या घोषणा !
- Ration Card Big Update : रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! आता गहू तांदळा सोबत मिळतील 5 हजार रुपये !
- Shivsena President : शिवसेना नक्की कोणाची? शिवसेना पक्षाच्या अध्यक्षस्थानी कोण असेल ठाकरे की शिंदे: जाणून घ्या सविस्तर !
- Business Idea : व्यवसायाची भन्नाट संकल्पना! तुमच्या गावामध्ये किंवा शहरामध्ये सुरू करा हा व्यवसाय होईल लाखोंची कमाई !