माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन अदा करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित .GR दि.28.10.2022

Spread the love

राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागा अंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका / मदतनिस / मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करणेबाबत दि.28.10.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय झालेला आहे . या संदर्भातील दि.28.10.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .

सदरच्या या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका , मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे माहे ऑक्टोंबर 2022 या महिन्याचे मानधन अदा करण्याकरीता प्रधान लेखाशिर्ष विद्यमान तरतुदीमधेन शासन निर्णयामध्ये दर्शविल्यानुसार एकुण 13323.24 एवढा निधी वितरीत करण्यास राज्य शासनाची मान्यता देण्यात येत आहे .यामध्ये पोषण आहार तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्याचबरोबर अंगणवाडी सेवा या लखाशिर्षाखाली निधी खर्च करण्याचे आदेश सदर निर्णयान्वये देण्यात आले आहेत .

अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आला आहे . या संदर्भातील महिला व बाल विभागाचा दि.28.10.2022 रोजीचा शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .

शासन निर्णय

Leave a Comment