शेतीपूरक व्यवसाय उभा करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना देत आहे इतके अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती व अर्ज कसा करावा .

Spread the love

महाराष्ट्र शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता राबवली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेळी पालन कुक्कुटपालन व दूध व्यवसाय यासोबतच शेड बांधण्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जाते. शासनाने हा जीआर 3 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर केला असून या शासन निर्णयाच्या माध्यमातून राज्यांमधील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून ही योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. पण मित्रांनो ही योजना नक्की काय आहे व यासाठी अर्ज कशा प्रकारे करावा याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेऊया.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास चार कामांसाठी चांगल्या प्रकारे अनुदान दिले जाते. यामध्ये गाय म्हैस यांचे संगोपन करण्यासाठी गोठा बांधणे, शेळीपालनासाठी गोठा बांधणे, यासोबतच कुक्कुटपालनासाठी सुद्धा गोटा बांधणे, नाडेप प्रकल्प राबविण्यासाठी गोठा बांधणी. या गोष्टींसाठी शासन अनुदान देत आहे.

कोणत्या कामासाठी नक्की किती अनुदान दिलं जाणार ?

गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्यासाठी या योजनेच्या माध्यमातून दोन जनावरांपासून सहा जनावरांपर्यंत गोठा बांधणी साठी 77,188 रुपये अनुदान दिले जाणार आहे. यासोबतच सहा पेक्षा अधिक गुणांसाठी म्हणजे सहाच्या पटीत दुप्पट म्हणजे बारा गुरांसाठी वरील रकमेच्या दुप्पट अनुदान दिले जाईल. यासोबतच 18 गुणांसाठी वरील रकमेच्या तिप्पट अनुदान शासन शेतकऱ्यांना देणार आहे.

शेळीपालन शेड बांधकाम

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावा लागतो तो अर्ज तुम्ही जवळील सेवा केंद्रामध्ये भेट देऊन अगदी व्यवस्थितपणे अर्ज करू शकता. अर्ज करत असताना आपली माहिती बिनचूक भरायचे आहे. यासोबतच अर्जासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे ती सुद्धा जोडायचे आहेत आणि अर्ज हा सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही जर या योजनेस पात्र असाल तर शासन तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून नक्कीच अनुदान देईल.

Leave a Comment