राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्य शासनाची कॅबिनेट बैठकीचे लवकरच आयोजन .

Spread the love

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक प्रलंबित मागण्या वेळोवेळी निवेदने देवूनही अद्यापर्यंत सदर मागण्यांवर कोणताही निर्णय राज्य शासनाकडुन घेण्यात आलेला नाही .यामुळे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने कठोर भुमिका घेतल्याने , राज्य शासनाला कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी कॅबिनेट बैठकीचे आयोजन करावे लागणार आहे .

महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघामार्फत विविध 14 प्रकारच्या मागणीबाबतचे निवेदन राज्य शासनास सादर केले होते . या निवेदनावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक आश्वासने दिले होते . परंतु या निवेदनावर कोणत्याही प्रकारचे निर्णय न घेतल्याने महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र सादर करुन प्राधान्याच्या मागण्यावर दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे . अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंब करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे . यामधील प्राधान्याच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहे .

प्राधान्याच्या मागण्या – सर्व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी , तसेच सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे ,बक्षी समिती खंड – 2 अहवाल लागु करण्यात यावा .तसेच केंद्र सरकारप्रमाणे वाढीव 4 टक्के महागाई भत्ता लागु करण्यात यावे .अशा प्राधान्याच्या मागणीवर दि.15.11.2022 पर्यंत सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती महासंघामार्फत करण्यात आली आहे .

यामुळे राज्य शासनावर कर्मचाऱ्यांचा मोठा दबाव वाढल्याने , शिवाय राज्याचे मुख्यमंत्री यांनी मागील निवेदनावर सकारात्मक आश्वासने दिले असल्याने , राज्य शासनास दि.15.11.2022 पर्यंत प्रथम प्राधान्यांच्या मागणींवर सकारात्म्क निर्णय घ्यावे लागणार आहे . याकरीता राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळाची लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल .ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल .

1 thought on “राज्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी राज्य शासनाची कॅबिनेट बैठकीचे लवकरच आयोजन .”

Leave a Comment