या शेतकऱ्यांनी सुरू केला सेंद्रिय खत निर्मितीचा प्रकल्प , आज करत आहे करोडोंची उलाढाल .

Spread the love

गावाकडे राहून उद्योग करू सुद्धा चांगली कमाई करता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर मधील रहिवासी नारायण हे स्वतः आहेत .नारायण स्वतः सेंद्रिय खत बनवतात व त्या खताची मार्केटिंग सुद्धा ते स्वतः करतात आणि विक्री करतात. त्यांनी उभा केलेल्या सेंद्रिय खताच्या प्रकल्पामुळे कित्येक लोकांना आता रोजगार सुद्धा उपलब्ध झाला आहे. नारायण यांनी 25 हजार रुपये मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. आज हा व्यवसाय कोटींची उलाढाल करत आहे.

25 हजार रुपये मध्ये खत तयार करण्याचे काम सुरू,

नारायण यांनी एम एस सी कृषी पशुसंवर्धन यासोबतच दुग्ध शास्त्राचे शिक्षण घेतल्यानंतर ते एका कंपनीमध्ये नोकरीला लागले. त्यावेळी त्यांना नोकरी करण्याची अजिबात इच्छा नव्हती त्यामुळे 2004 साली नारायण यांनी स्वतःची नोकरी सोडून शेतामध्ये सेंद्रिय खत तयार करण्यास सुरुवात केली. हे काम करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला फक्त 25 हजार रुपये गुंतवले आणि त्याच कालखंडामध्ये त्यांनी जवळपास सहा लाख रुपयांचा नफा मिळवला.

यामुळे त्यांनी नोकरी सोडली होती

नारायण त्यांच्या प्रवासाबद्दल असे सांगत आहेत की, कंपनीमध्ये नोकरी करत असताना त्यांनी एरिया मॅनेजर पासून मॅनेजर पर्यंत प्रवास केला. पण त्या कामांमध्ये ते अजिबात समाधान न्हवते. त्यांच्या गावामध्ये एकदा किसान मेळावा भरला होता. त्या चर्चेच्या दरम्यान सेंद्रिय खत बनवण्याची नवीन संकल्पना उदयास आली.

तरुणांसाठी उत्तम उदाहरण

नारायण यांनी 2009 मध्ये नरेंद्र देव कृषी विद्यापीठ यांच्याकडून उद्योगपती कोट्यातून कार्यकारी परिषदेचे सर्वात तरुण सदस्य सुद्धा बनले. अनेक तरुणांना त्यांनी प्रशिक्षण दिले आणि त्या तरुणांना त्यांनी स्वावलंबी बनवले. आज ते कमी पैशांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देऊन त्यांची मदत करत आहेत.

Leave a Comment