AIR INDIA : एअर इंडिया पुणे येथे  12 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी !

Spread the love

एअर इंडिया मध्ये केबिन क्रु पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , कोणत्याही प्रकारची परीक्षा न घेता केवळ मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे . सदर पदांसाठी आवश्यक पात्रताधारक उमेदवारांनी जाहीरातीमध्ये नमुद कालावधीमध्ये मुलाखतीस हजर रहावे लागणार आहे . या पदांसाठी आवश्यक पात्रता , अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदांचे नाव – केबिन क्रू ( केवळ महिला उमेदवारांकरीता )

पदांची संख्या – पद संख्या तुर्तास प्रविष्ठ नाहीत .

पात्रता / वयोमर्यादा – सदर पदांसाठी उमेदवारांची कोणत्याही शाखेतुन 12 वी मध्ये 60 टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर उमेदवारांची उंची 155 सेमीमीटर असणे आवश्यक तर BMI 18 ते 22 दरम्याने असेण आवश्यक आहे . सदर पदांसाठी फ्रेशर्स उमेदवारांकरीता वयोमर्यादा 18 ते 22 वर्षादरम्यान असणे आवश्यक तर अनुभवी उमेदवारांकरीता वयोमर्यादा 18 ते 32 वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://content.airindia.in/careers/currentopenings/1  या संकेतस्थळावर क्लिक करुन अर्ज सादर करु शकता , पात्रताधारक उमेदवारांची दि.10.11.2022 रोजी थेट मुलाखत घेण्यात येईल .यासाठी आवेदन फीस आकारली जाणार नाही .

थेट मुलाखतीचे ठिकाण ( Venue ) : Hotel Blue Diamond 11 Koregaon Road Pune – 411001 अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment