काँग्रेसची सत्ता आल्यास , कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन – राहुल गांधी .

Spread the love

सध्या देशाच्या राजकारणामध्ये , कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे .गुजरात राज्यामध्ये , विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत . या निवडणुकीच्या प्रचारामध्ये , काँग्रेच पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात राज्यामध्ये काँग्रेची सत्ता स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन दिले आहे .

राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये , खुच कमी पेन्शन मिळत असल्याने , कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी यासाठी कर्मचाऱ्यांचा मोठा लढा सुरु आहे . देशांमध्ये आम आदमी पार्टी व काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यांमध्ये कर्मचाऱ्यांना परत जुनी पेन्शन योजना लागु करण्यात आलेली आहे .यामुळे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन संदेश दिला आहे कि , गुजरात मध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना परत सुरु करण्यात येतील .

त्याचबरोबर गुजरात राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेत समावून घेणे तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना वेळेवर प्रमोशन देण्याची व्यवस्था करु असही ट्विट मध्ये सांगितले आहे .

Leave a Comment