Breaking News : राज्य कर्मचारी नोव्हेंबरमध्ये जाणार बेमुदत संपावर , कर्मचारी क्रांतीकारी उठावाच्या तयारीत !

Spread the love

सध्या देशामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शनचा मुद्दा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरला आहे .देशातील सरकारी कर्मचारी जुनी पेन्शनसाठी क्रांतिकारी लढा सुरु केला आहे . जुनी पेन्शन मुद्द्यावर देशातील सर्व कर्मचारी एकत्र येत आहेत .देशामध्ये सर्व राज्यातील कर्मचारी एकजुटपणे लढा देत असल्याने , सरकारला जुनी पेन्शन योजनाची मागणी मान्य करावी लागणार आहे .

देशामध्ये पश्चिम बंगाल हे एकमेव राज्य आहे ,ज्या राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना कायम ठेवली आहे .त्याचबरोबर देशातील छत्तीसगढ ,झारखंड , राजस्थान , पंजाब राज्य सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना ( NPS ) योजना रद्द करुन जुनी पेन्शन योजना ( Old Pension )  सुरु केली आहे . यामुळे देशातील सर्वच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनची आशा पल्लवित झाल्या आहेत .हिमाचल प्रदेश व गुजरात राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शनच्या मुद्यावर आक्रमक भुमिका घेतली आहे . असेच वातावरण महाराष्ट्र राज्यात काही दिवसांनी पाहायला मिळेल .

राज्य कर्मचारी बेमुदत संपावर जाणार –

देशामध्ये छत्तीसगढ , झारखंड , राजस्थान , पंजाब सारख्या राज्यांनी जुनी पेन्शन लागु केली आहे . तर महाराष्ट्र राज्य सरकारला का जमत नाही ?  असा सवाल कर्मचाऱ्यांकडुन विचारला जात आहे .शिवाय महाराष्ट्र राज्य सरकार या मुद्यावर उदासिन भुमिका घेत असल्याने , राज्य सरकारी कर्मचारी नोव्हेंबरमध्ये बेमुदत संपावर जाण्याची तयारी करत आहेत . या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वच संघटना एकत्र येवून लढा देणार आहेत . यामुळे कर्मचाऱ्यांचा हा क्रांतिकारी उठाव असणार आहे .

Leave a Comment